तंत्रस्नेहाच्या बेडीमध्ये जगातल्या सगळ्याच गोष्टी सुलभ-सोप्या आणि अल्पमार्गी होऊ लागल्या असतील, तर त्यापासून अभ्यासाच्या पारंपरिक पद्धती लांब कशा राहतील? नोट्सं ही म्हटलं तर अभ्यासात उपयोगी पडणारी गोष्ट . अजून आपल्याकडेसर्वत्र लॅपटॉपवर नोट्स घेण्याचं फॅड फारसं नाही, पण मोठय़ा महानगरांमध्ये ते आहे. लॅपटॉपवर नोट्स काढताना आपण वर सांगितलेली सगळी गंमत गमावून बसतो आहोत, कारण लॅपटॉपवरच्या नोट्स या आभासी जगात तुम्ही मेलवरूनही एक बटन दाबून त्याला किंवा तिला पाठवू शकता. मुळात लिहिणं ही कलाच आहे. ती संगणकाच्या कीबोर्डमुळे विसरली जाऊ शकते. किमान पक्षी अक्षर तरी खराब होऊ शकते. तंत्रस्नेही बनून इतर अनेक गोष्टींप्रमाणे आनंदाची आणखी एक खूण कालबाह्य़ होण्याआधी नोट्सविज्ञानावर टाकलेला दृष्टिक्षेप..
वाईट अक्षर, चांगलं अक्षरं, टायिपग
परदेशी विद्यापीठातील प्रयोग
नोट्स म्हटल्या की, वही आली, वहीतलं मोरपिस आलं, त्या वहीचा कोरा सुखावणारा वास आला, पण आता हळूहळू ती गंमत अस्तंगत होत चाललीय. परदेशात तर अशीच परिस्थिती आहे. परदेशातल्या सिमॉन फ्रेझर विद्यापीठातली गोष्ट आहे, एकदा एका शिक्षकांनी सांगितले की, उद्यापासून कुणीही वर्गात लॅपटॉप आणायचे नाहीत. पेन व वही घेऊन यायची व नोट्स घ्यायच्या. मुलांना वाटलं, ठीक आहे, ही काही फार अवघड गोष्ट नाही. दुसऱ्या दिवशी पेन आणि वही घेऊन मुले आली; पण त्यातील निम्म्या मुलांना वहीत लिहिताच येईना, त्यामुळे त्यांना वर्गाबाहेर जाण्याशिवाय तरणोपाय नव्हता.
नोटसमधील फरक
संगणकावर नोट्स टाइप करणं आणि हाताने नोट्स घेणं यात फार फरक आहे. पेन इज मायटियर दॅन लॅपटॉप, हे विधान निदान अभ्यासासाठी नोट्स घेणाऱ्यांसाठी सत्य आहे. लॉस एंजल्समधील कॅलिफोíनया विद्यापीठात पॅम म्यूलर व डेव्हिड ओपनहायमर यांनी केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, ज्यांनी पेनने नोट्स लिहून घेतल्या होत्या त्यांना चांगले ज्ञान प्राप्त झाल्याचे त्यांच्या उत्तर पत्रिकातूनच दिसून येत होते व ज्यांनी लॅपटॉपवर नोट्स घेतल्या ते मागे पडले होते. अनेकदा लॅपटॉपवर नोट्स घेताना आपण कसे टाइप करतो आहे याकडे लक्ष राहते. म्हणजेच तंत्रावर लक्ष अधिक राहते, अभ्यासावर कमी राहते. जी मुले लॅपटॉपवर नोट्स घेत होती त्यांचे लिहिताना आपण काय लिहून घेतो आहोत याकडे अजिबात लक्ष नव्हते.
कागद आणि पेन
कागद आणि पेन यांची दोस्ती जुनी आहे. त्यांचा वापर करणारे विद्यार्थी काळजीपूर्वक लिहित असतात. संगणकावर टाइप केल्याने आपण लेखनाची कला विसरून जाऊ. सुलेखन तर बाजूलाच राहिले. लॅपटॉपवर नोट्स घेताना आपण केवळ शिक्षक सांगतात ते कॉपी करीत असतो. संशोधनात असे आढळून आले की, जी मुले कागद-पेनने नोट्स घेत होती, त्यांचे नेमका काय विषय आपण लिहितो आहोत याकडे बरोबर लक्ष होते. पण, जे लॅपटॉप वापरत होते त्यांच्या संकल्पना अजिबात स्पष्ट झाल्या नव्हत्या. जेव्हा त्यांना एखादी गोष्टी आठवायची वेळ यायची तेव्हा ती अजिबात आठवायची नाही.
व्याख्यान म्हणजे शब्दांची जुळणी नव्हे
हाताचे आपल्या मेंदूशी वेगळे नाते आहे. जेव्हा आपण विचार किंवा कल्पना तयार करीत असतो तेव्हा त्यांचा वेग आणि संगणकाचा वेग जमतं नाही. आपली कल्पनाशक्ती संगणकाला कशी कळणार? सर्व मुलांनी आता लॅपटॉप फेकून वही-पेन घेऊन बसावे असे माझे म्हणणे नाही. प्रत्येक सेमिस्टरला मुले मॅकबुक घेऊन येतात तेव्हा त्यांच्या हस्तलेखनाचा मृत्यू झाला आहे असे म्हणण्यावाचून गत्यंतर राहात नाही. – व्हर्जििनया बेरिनगर यांच्या संशोधनातील निष्कर्ष
शिक्षणाच्या समाधानासाठी
कागद-पेन शिवाय शिक्षणाचे समाधानही मिळत नाही, कल्पनाशक्तीवर परिणाम होतो. सांगितलेले कृत्रिम पद्धतीने टाइप केले जाते, एकही संकल्पना नंतर कळत नाही नंतर त्याचा परिणाम परीक्षेत कळतो. याचा अर्थ सर्वानी आता लॅपटॉप, टॅबलेट फेकून द्यावेत व वही-पेन घेऊन बसावे असे म्युलर व ओपनहायमर यांचेही म्हणणे नाही, कुणाचेही असणार नाही; फक्त त्याचा वापर नोट्स घेण्यासाठी करू नये. काही मुले तर चक्क परीक्षा जवळ आली की, नोट्स झेरॉक्स करतात. पण त्यात लिहिण्याची क्रिया टाळली जाते त्यामुळे घोकंपट्टी करूनही काही लक्षात राहात नाही. आपण लिहितो तेव्हा ती गोष्ट जास्त स्मरणात राहते.
डिजिटल समन्वय
लॅपटॉप, स्मार्टफोन, फॅबलेट, टॅबलेट ही नोट्स घेण्यासाठीची डिजिटल साधने आहेत. तरीही त्यात कागद-पेनचे समाधान नाही, हे तंत्रज्ञान निर्माण करणाऱ्या धुरिणांच्या लक्षात आले आहे, कारण कागदावर लिहिण्याचा अनुभव डिजिटल साधनांवर हुबेहूब तयार करण्याची कल्पना अजून पूर्णपणे प्रचलित नाही. अगदी न्यूयॉर्क टाइम्सनेही याचा अभ्यास करून असे सांगितले आहे की, अनेक अभ्यासानुसार हाताने लिहिण्याला पर्याय नाही. त्यामुळे काही कंपन्यांनी की-बोर्डला डिजिटल पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. मायक्रोसॉफ्टने प्रथम ‘प्रो-३’ हा प्रगत स्टायलस तयार केला. यात डिजिटल स्वरूपाच्या पडद्यावर डिजिटल पेन वापरून लिहिता येते, चित्रे काढता येतात. इम्प्रूव्ह इलेक्ट्रॉनिक्सने बुगी बोर्ड सिक्रोनस ९.७ या डिजिटल स्लेट पाटय़ा तयार केल्या. अडोनीटने टॅबलेटमध्ये सुधारणा करून जॉट स्क्रीप्ट एव्हरनोट ही स्टायलसची एडिशन आणली. लाइव्हस्क्राइब थ्री स्मार्टपेन या प्रणालीत स्टायलसचा वापर करतात. त्यात वेगळा कागद व पेन असतो त्याने डिजिटल पद्धतीने नोट्स घेता येतात.
क्रिस्टल स्टायलस
चीनचा अनुभव
ग्राफोलॉजी
मानसशास्त्र काय सांगते
लिहिण्याची कला आपण गमावून बसलो तर शिकण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होईल, हाताने लिहिणाऱ्या मुलांचे गुण नेहमीच जास्त असतात. एखादी गोष्ट करून पाहात शिका हे तत्त्व हस्तलेखन टाळल्याने मारले जाते. हाताने लिहितो तेव्हा वर्गात सांगितलेले आपल्या जास्त लक्षात राहते. इतर वेळेस आपण केवळ स्टेनोग्राफर सारखे लिहून घेत असतो. हाताने लिहिण्याला वेग नसतो पण त्यामुळे आपल्या मेंदूत माहिती पक्की नोंदली जाते व वेळेला आठवतेही.
कॅलिग्राफी
वळणदार अक्षरांची ही कला आहे. लेखनच केले नाही तर ही कला टिकणार नाही. अगदी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्येही निमंत्रणे लिहिण्यासाठी कॅलिग्राफर्स ठेवलेले आहेत. नंतर थोडे काम संगणकावर केले जाते.
– डॅनियल ओपनहायमर
– पॅम म्युलर
कीबोर्डमुळे जगात शाळकरी मुलांवर जेवढा परिणाम झाला नाही तेवढा चिनी मुलांवर झाला आहे. त्याचा परिणाम चिनी भाषेच्या हस्तलेखनावर होत आहे. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचा लोकांच्या लिहिण्याच्या सवयींवर झालेला परिणाम हा न पुसला जाणार आहे, त्यावर आपण काहीच करू शकत नाही. कॅलिग्राफीसारख्या कलेतून भाषा जिवंत ठेवणे हा यावरचा एक मार्ग आहे.
– टेलिव्हिजन शोचे निर्माते ग्वान झेनग्वान
चिनी अक्षरे माझ्या डोक्यात आहेत, पण ती कशी लिहायची ते माहीत नाही, केवळ संगणकाच्या मदतीने ती वापरता येतात.
– पत्रकार झँग शियोसाँग
चिनी वर्णाक्षरे शिकणे ही जीवनभराची प्रक्रिया आहे, तुम्ही जास्त काळ ती वापरली नाहीत तर तुम्ही ती विसरून जाणार हे ठरलेले आहे. – चिनी भाषेला वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक हावो मिंगजियान