दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भात हे भारतीय लोकांचे मुख्य अन्न मानले जाते. बदलत्या हवामानामुळे भात पिकालाही किडी आणि रोगाचा सामना करावा लागतो. याचा एकत्रित सामना करता आला तर निश्चितच या कीड व रोगापासून या पिकांचे चांगले संरक्षण करता येते, आणि उत्पादनात होणारी घटही टाळता येते.

भात हे भारतीय लोकांचे मुख्य अन्न मानले जाते. मान्सूनच्या पावसावर हे पीक होत असले तरी ज्या परिसरात वार्षिक पर्जन्यमान ८०० मिलीमीटर आहे अशाच भागात या पिकाला पोषक वातावरण मिळत असल्याने कोकणात या पिकांखालील क्षेत्र जास्त आहे. मात्र, बदलत्या हवामानामुळे या पिकालाही किडी आणि रोगाचा सामना करावा लागतो. याचा एकत्रित सामना करता आले तर निश्चितच या कीड व रोगापासून या पिकांचे चांगले संरक्षण करता येते, आणि उत्पादनात होणारी घटही टाळता येते.

भातावर तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे आणि पांढरे तुडतुडे असे तीन प्रकारचे तुडतुडे बागायती पाणथळ क्षेत्राध्ये आढळून येतात. त्यापैकी तपकिरी तुडतुडे सर्वात जास्त हानिकारक आहेत. ही कीड पाण्याचा निचरा योग्य प्राणात न होणाऱ्या, घन लागवड केलेल्या आणि नत्र खताची मात्रा वाजवीपेक्षा जास्त प्राणात दिलेल्या शेतात प्रामुख्याने आढळून येते. त्याबरोबर,  २८ ते ३० सेल्सियस तापमान, ८५ टक्के पेक्षा जास्त आद्र्रता आणि कमी पाऊस असे हवामान या किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक ठरते.

तुडतुडे व त्यांची पिले सतत खोडातील अन्नरस शोषून घेतात त्यामुळे रोपांची पाने पिवळी पडतात. उपद्रव मोठय़ा प्रमाणावर असेल तर रोपे वाळतात व जळल्यासारखी दिसतात.  शेतात ठिकठिकाणी तुडतुडय़ामुळे करपून गेलेले गोलाकार भाताच्या पिकाचे खळे दिसतात यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि आल्याच तर दाणे न भरता पोचट राहतात.  प्रादुर्भाव दिसून येताच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

तुडतुडयाचे नियंत्रण वेळीच करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या पिकाचे नियमित सर्वेक्षण करणे आवश्यक ठरते. तुडतुडय़ांचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लावणी दाट करू नये, दोन ओळीतील अंतर २० सें.मी. आणि दोन चुडातील अंतर १५ सें.मी-. ठेवावे तसेच रोपांची पट्टा पध्दतीने लागण केल्यास तुडतडे नियंत्रण सुलभ होते. नेहमी प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात नत्र खताची मात्रा वाजवी प्रमाणात द्यावी,  शेतातील पाण्याचा निचरा नियमित करावा, पाणी बदलावे, टेहळणीसाठी प्रकाश सापळय़ांचा वापर करावा, प्रत्येक चुडात १० तुडतुडे या आर्थिक नुकसान पातळीच्या आधारे कीटकनाशकाची फवारणी  करावी. यासाठी हेक्टरी ५०० लिटर पाण्यात इमिडाक्लोरोप्रीड १७.८ टक्के १२५ मि.ली. किंवा थायामिथझम २५ टक्के डब्ल्युजी १०० ग्रॅम किंवा क्लोथियानिडीन ५० टक्के २५ ग्रॅम किंवा बुप्रोजीन २० टक्के   प्रिफ्रोंनील ३ टक्के एससी ५०० मि.ली. मिसळून फवारावे किंवा इथोनप्रायस १० टक्के ५०० मि.ली. किंवा फेनोबुकार्ब (बी.पी.ए.सी.) ५० टक्के ६०० मि.ली. या प्रमाणात फवारणी करावी, फवारणी करताना कीटकनाशक फुटव्याच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. आठवडय़ानंतर परत प्रादुर्भाव आढळल्यास दोन ते तीन फवारण्या कराव्यात, कीटकनाशके बदलून वापरावीत.

खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या किडीच्या अळीचा प्रसार वाऱ्याबरोबर होतो, तर पतंग कमी पाऊस, जास्त सूर्यप्रकाश तसेच रात्रीची जास्त आद्र्रता असताना बाहेर पडतात. अंडय़ातून नुकतीच जन्माला आलेली अळी काही काळ (१ ते २ तास) पानाच्या टोकावर राहते आणि पानाचा पृष्ठभाग खरवडते. साधारणपणे १ ते २ तासाने ती आपल्या लाळेपासून एक चिकट धागा बाहेर टाकते आणि त्याला लोंबकळत राहाते. वाऱ्यामुळे अशा अळय़ा सर्व शेतभर पसरतात. तिची योग्य वाढ झाल्यावर ती खोडाकडे सरकते आणि खोडाला बारीक छिद्र पाडून आत प्रवेश करते. अळी खोडाचा गाभा पोखरून खाते. या अळीच्या कातडीखाली असलेल्या हवेच्या पोकळीमुळे त्या पाण्यात पडल्या तरी देखील व्यवस्थित पोहू शकतात.

अळी खोडात शिरली की साधारणपणे १ आठवडय़ापर्यंत खोडातच राहते. एका फुटव्यात बहुतांशी एकच अळी दिसून येते. पण कधी-कधी चार अळय़ा देखील आढळून येतात. एका आठवडय़ानंतर अळी फुटव्याबाहेर येते आणि दुसऱ्या फुटव्यात प्रवेश करते परिणामी अनेक फुटवे मरतात. या कीडीचा प्रदुर्भाव दिसून येताच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा उत्पादनात घट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधुंना पिवळा खोडकिडा या किडीचा  प्रादुर्भाव आढळून येताच खालील उपाय योजना करण्याची गरज आहे. :

तांत्रिक पद्धतीचा अवलंब

पिकाच्या हंगााच्या सुरुवातीलाच म्हणजे पाऊस सुरू होताच कोषावस्थेतून बाहेर आलेले मादी पतंग प्रकाश सापळय़ात आकर्षित करुन नष्ट करावेत; किडीचे अंडीपुंज वेळोवेळी गोळा करून नष्ट करावेत; कीडग्रस्त फुटवे उपटून नष्ट करावेत; या किडीच्या सर्वेक्षणासाठी प्रति हेक्टर ५ फेरोमेन सापळे लावून त्या अडकलेल्या पतंगांचे निरीक्षण करावे.

जैविक नियंत्रण

नैसर्गिक शत्रू उदा. बेडूक आणि चतूर अशांचे भात खाचरात संवर्धन करावे. ट्रायकोग्रामा जापोनिक या खोडकीडीच्या अंडय़ावरील परोपजीवी कीटकाची १ लाख अंडी/हेक्टर या प्राणात २ वेळा प्रथम प्रादुर्भाव दिसून येताच व नंतर १५ दिवसांच्या अंतरात शेतात प्रसारीत करावीत.

कीटकनाशकांचा वापर

खोडकिडा प्रादुर्भावीत भागाध्ये पुनर्लावणीकरिता रोप उपटण्यापूवी पाच दिवस आधी काबरेफ्युरॉन ३ जी २५ किलो प्रति हेक्टर किंवा  फिप्रोनील ०.३ जी २५ किलो/हे. किंवा कारटॅप ४ जी २५ किलो/हे. किंवा फ्ल्यूबेंडाईड २०डब्ल्यू जी १२५ ग्रॅम/हे. किंवा  फिप्रोनील ०.३ जी २५ किलो/हे किंवा  क्लोरॅट्रॅनिलीप्रोल ०.४ टक्के जी आर १० किलो प्रति हेक्टर यापैकी कोणतेही एक कीटकनाशक आलटून पालटून वापरावे.

 कारटॅप हायड्रोफलोराईड ७५ एस जी १० ग्रॅम किंवा फ्ल्यूबेंडामाईड ४ टक्के   बुप्रोफोजीन २० टक्के एस सी १४ मि.ली. किंवा  क्लोरॅट्रॅनिलीप्रोल १८.५ एस सी ३ मि.ली. किंवा क्विनालॉस २५ टक्के प्रवाही २६ मि.ली. किंवा  क्लोरपायरीस २० ईसी २५ मि.ली किंवा कारटॅप ह्रेडोक्लोराईड ५० टक्के २० ग्रॅम किंवा फ्ल्युबेंडामाईड २० डब्लुजी २.५ ग्रॅम यापैकी कोणतेही कीटकनाशक दोन वेळा १५ दिवसाचे अंतराने १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

digambar.shinde@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pest management in paddy pest control in paddy management of rice insect pests zws
First published on: 14-06-2022 at 02:28 IST