काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे लष्करी ताफ्यावर फेब्रुवारीत आत्मघातकी हल्ला झाला. पठाणकोटनंतर झालेला हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला होता. त्यानंतर भारताने हवाई लक्ष्यभेदी हल्ला करून दहशतवादी तळ नष्ट केले. सैन्यदलाच्या शौर्यगाथेचा भाजपकडून लोकसभा निवडणुकीत पक्षीय प्रचारासाठी वापर केला गेला.