उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्र-समूहाने ‘एक्स्प्रेस सिटिझन्स रिलीफ फंड’ नावाने एक मदतनिधी स्थापन केला. या आवाहनाला आपण सर्वांनी मोठ्या मनाने मदत केल्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. ‘एक्स्प्रेस सिटिझन्स रिलीफ फंड’द्वारे आजवर दोन कोटींहून अधिक रूपयांचा निधी जमा झाला आहे. देशाच्या कानाकोप-यातून सर्व स्तर आणि वयोगटांतील लोकांनी यामध्ये आपला हातभार लावला आहे. अद्यापही हा मदतीचा ओघ आटलेला नाही आणि हीच एक्स्प्रेस वृत्तसमूहाची विश्वासार्हता आहे, असं आम्ही मानतो. जमा झालेल्या निधीपैकी प्रत्येक पैसा हा पिडित व्यक्तींपर्यंत पोहोचवला जाईल अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो. तेथील जनजीवन पूर्वपदावर आणण्यात तुमच्या देणगीचाही कसा वाटा आहे, हे आम्ही वेळोवेळी तुम्हाला कळवू. तुमच्या निधीचा कुठे कसा उपयोग झाला याबद्दलचीही माहिती तुम्हाला आमची वृत्तपत्रे आणि संकेतस्थळांवरून वेळोवेळी दिली जाईल. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून आभार.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Aug 2013 रोजी प्रकाशित
आभार
उत्तराखंडमधील नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्र-समूहाने 'एक्स्प्रेस सिटिझन्स रिलीफ फंड' नावाने एक मदतनिधी स्थापन केला.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-08-2013 at 06:11 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thanks the indian express citizens relief fund