स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीचे हे वर्ष असल्याने ‘चार शब्द’ दिवाळी अंकामध्ये यंदा स्वामी विवेकानंद यांच्यावर ‘युगदर्शी स्वामी’ हा विषय घेण्यात आला आहे. सुप्रसिद्ध मुखपृष्ठकार बाळ ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्वामी विवेकानंदांचे मुखपृष्ठावरील अप्रतिम चित्र पाहिल्यावरच अंकातील विषयांचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. त्या दृष्टीने समर्पक आणि तितकेच लक्षवेधक चित्र हे या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ म्हटले पाहिजे.
स्वामी विवेकानंदांविषयीचे आकर्षण ते हयात असताना होते तेवढेच आजही आहे, हे अंकातील सर्व लेख वाचताना सहज लक्षात येईल. डॉ. यशवंत पाठक, डॉ. सच्चिदानंद शेवडे, डॉ. पद्माकर विष्णू वर्तक, डॉ. विजया वाड, क्रांतिगीता महाबळ, प्रा. प्रतिभा सराफ, मल्हार कृष्ण गोखले अशा मान्यवरांच्या उद्बोधक ठरणाऱ्या लेखांबरोबरच ‘स्वामी आणि मुंबई नगरी’, ‘स्वामी आणि तरुणाई’ असे वाचनीय लेखही यात आहेत. बुलढाणा जिल्हय़ातील मेहकर तालुक्यातील हिवरा बुद्रुक या गावी महाराजश्री शुकदास यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी भारले गेल्याने विवेकानंद आश्रम सुरू केला. लोककल्याणाच्या हेतूने शुकदास यांनी केलेले काम यावर विजय साखळकर यांचा लेख असून हिवरा बुद्रुक या छोटय़ा गावीसुद्धा मानवी कल्याणासाठी लोक काम करतात याची माहिती लोकांपर्यंत पोहोचू शकेल. किंबहुना स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्त्व आणि विचार यातून प्रेरणा घेऊन विविध क्षेत्रांत लोक कसे काम करून दाखवतात याचेच हे उत्कृष्ट उदाहरण ठरावे.
संपादक : अरुण मानकर,
पृष्ठे : २१२, किंमत : ९० रुपये
अक्षरगंध
संपादिका : मधुवंती सप्रे,
पृष्ठे : २००, किंमत :१२० रुपये
सांजपर्व
कवी ग्रेस आणि दुबरेधता, शब्दकळेची चमत्कृती या जणू एका नाण्याच्या दोन बाजू. दै. मराठवाडाच्या ‘सांजपर्व’ या दिवाळी अंकात या महाकवीच्या काव्यातील सौंदर्यस्थळे व शक्तिस्थाने शोधण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी ‘चांदणे तुझ्या स्मरणाचे’ हा परिसंवादच घेण्यात आला असून त्यात वसंत आबाजी डहाके, विजय पाडळकर, नारायण कुलकर्णी कवठेकर, डॉ. आशा सावदेकर, डॉ. तीर्थराज कापगते, वामन देशपांडे यांनी ग्रेस यांच्या काव्याचा धांडोळा घेतला आहे. ‘मी महाकवी दु:खाचा प्राचीन नदीपरी खोल, दगडाचे माझ्या हाती, वेगाने होते फूल..’ अशा रोमांचकारी काव्यपंक्ती पानोपानी वाचण्यास मिळतात.
अमर रामटेके यांचे ‘गोडघाटे चाळ’ हे फोटोफीचर वैशिष्टय़पूर्ण आहे. याशिवाय १९६० ते १९७० या कालावधीतील पाच सर्वोत्तम कथा यात वाचण्यास मिळतात.
फ. मु. शिंदे, अशोक बागवे, प्रज्ञा पवार, अनुपमा उजगरे, अस्मिता गुरव आदी तब्बल ४०-४५ कवींच्या कवितांची मेजवानीही यात आहे. संपादक : राम शेवडीकर,
पृष्ठे : २०८, किंमत : १०० रुपये
लोकसाथी
या दिवाळी अंकाचे हे २७वे वर्ष आहे. कर्तव्यदक्ष पोलिसांना उद्देशून हे शीर्षक योजण्यात आले आहे. अपुरे
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दत्ता केशव यांचा ‘रंगात रंगले मराठी चित्रपट सारे’ हा लेख माहितीपूर्ण आहे. शांतारामबापूंच्या ‘पिंजरा’ या पहिल्या मराठी रंगीत चित्रपटातून प्रेरणा घेऊन दत्ता केशव यांनी ‘बायांनो नवरे सांभाळा’ या रंगीत चित्रपटाचा प्रतिकूल परिस्थितीत घाट घातला, या निर्मितीत त्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागले, याच्या आठवणी त्यांनी यात जागविल्या आहेत. ज्येष्ठ ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी एका आगामी चित्रपटासाठी लिहिलेल्या ‘अकुलीना’ या कथेचा सारांशही यात वाचण्यास मिळतो.
संपादक : वैजनाथ भोईर,
पृष्ठे : २१२, किंमत : १००
