सेलिब्रिटींच्या अनेक गोष्टींकडे सर्वसामान्यांचे लक्ष असते. ते खातात काय, त्यांची गाडी कुठली असे अनेकविध प्रष्टद्धr(२२४)न मनात डोकावत असतात. सेलिब्रिटींचे थंडीतले डाएट कुठले हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की नाही..
शीतल पाठक
आईने दिलेले मेथी व डिंकाचे लाडू हा थंडीतील माझा ‘मेन मेन्यू’. या दिवसांत तेलकट-तिखट खूप कमी करते, पण हा लव्हली मौसम खाण्याचा मूड वाढवणारा असल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. तेव्हा व्यायाम हवा. ऐन थंडीत पुण्यातील मँगो मस्तानी आइस्क्रीमवर ताव मारते. ‘चेहेरा’ या हिंदी चित्रपटाच्या रात्रीच्या चित्रीकरणाच्या वेळी खूपच थंडी जाणवली. दोन-तीन ब्लँकेट अंगावर घेऊनही ‘बचाव’ होत नव्हता. व्हिस्की पिणाऱ्यांची सोय झाली हो, मी मात्र शेकोटीच्या साहाय्याने चहावर चहा पीत होते.
तेजश्री खेले
सारा प्रवण
निशा परुळेकर
मटण- मासे- बटर- चीज- भाज्या- फळे- डाळी- चॉकलेट्स- आइस्क्रीम.. अरे बापरे, थंडीचा प्यारा मौसम नि हे सबकुछ खाण्याची चंगळमंगळ. मी या दिवसांत मागेपुढे कुठेही न पाहता भरपूर व मनसोक्त खाते आणि न विसरता व्यायाम करून हे सगळे पचवतेदेखील. एक ‘खादाडा मौसम’ म्हणजे ही गुलाबी-बदामी थंडी. एका थंडीतच मी जानू बरुआ दिग्दर्शित ‘बटरफ्लाय केक’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सिक्कीमच्या बर्फाळ प्रदेशात खूप खूप नाचल्याने दोन आठवडय़ांत माझे चक्क दहा किलो वजन कमी झाले. पण त्यातला आनंद खूप मोठा व खरा होता. कुडकुडीत मौसम म्हणून थंडी हवीच.
किशोरी शहाणे वीज
हेमांगी कवी
ऊर्मिला कानेटकर-कोठारे
एवीतेवी मी खाण्याची मस्त शौकीन, त्यात थंडीचा खावो मौसम, यासारखी सोनेरी- रुपेरी- चंदेरी संधी ती कोणती? फक्त नारळपाणी मी पीत नाही. पण या दिवसांतील वाढती भूक मी भरपूर पपया व चिंबोरी खाऊन एन्जॉय करते. या दिवसांतील हे पौष्टिक खाणे उन्हाळ्यात सदुपयोगी ठरते.
मैथिली जावकर
माझ्या ‘छबू पळाली सासरला’ या चित्रपटाचे सगळे चित्रीकरण ऐन थंडीत चौक, कर्जत, मोर्बे धरण अशा ठिकाणी झाल्याने हा मौसम काय चीज असते याची कल्पना आहे. सेटवर चहा वाहत होता असे म्हटले तरी चालेल. त्यात मोर्बे धरणात माझा पोहण्याचा प्रसंग, तोही रात्री.. थंडीत. मी खूप उशिरा पोहण्याच्या व्यायामाला नेहमीच प्राधान्य देते, त्यामुळे खाणेही पचते. विशेषत: दुधात हळद टाकून प्यायल्याने घशाचा त्रास वाचतो. खजूर व चिकन फस्त करतेच. पण थंडीमुळे समुद्रात मासे वर येत असल्याने ते खूप स्वस्तही मिळतात. म्हणून तर ते भरभरून खावेत. ऐसा मौका फिर कब मिलेगा. ‘छबू पळाली सासरला’ कधी पूर्ण झाला हे म्हणूनच समजले नाही.
प्रार्थना तांडेल
कॉलेजच्या शेजारीच असलेल्या ‘हाजीअली’ फास्टफूड सेंटरमध्ये आम्हा खवय्यांची रोज गर्दी असते. सातपासून नऊ वाजेपर्यंत लेक्चर अटेंड केल्यानंतर एक ब्रेक तो बनताय बॉस! आणि त्यातून ही थंडी त्यामुळे प्रचंड भूक लागते. आमच्या फेव्हरेट हाजीअली सेंटरमध्ये जाऊन आम्ही वेज पफ, पिझ्झा बेदम ताव मारत खातो. थंडीच्या थंड वातावरणात गरमागरम पदार्थ आवर्जून खावेसे वाटतात. चायनीज टच असलेली वाफाळती ‘सोया चिली’ माझी थंडीत खाण्याची आवडती डिश. खरोखरच हा पदार्थ खाल्ल्यावर अंगातली थंडीही नाहीशी होते असा माझा अनुभव आहे. सोबत बटाटय़ाच्या काचऱ्यांवर रोझमेरी नामक मसालाही मी हाजीअली या माझ्या फेव्हरेट फूड सेंटर मध्ये आवर्जून खाते.
देवेंद्र यादव :
थंडीत खाण्याची मौज प्रत्येकालाच स्वर्गीय सुखकारक वाटत असली तरी थंडीत आरोग्यही तितकंच महत्त्वाचं. मस्त थंडी म्हणजे मस्त ताज्या विविध भाज्या! आणि असंच ‘किती छान भाज्यांचे प्रकार विविध हॉटेल्समध्ये मिळतात. थंडीत भाज्यांचे विविध पदार्थ मी आवर्जून खातो. म्हणून बेक्ड व्हेजिटेबल्सची डिश मी सगळ्यात आधी मागवतो. आता नुसत्या बेक्ड भाज्या कुठे चालतायेत? म्हणून थोडी चव येण्यासाठी बाब्रेक्यू सॉस आठवणीने मागवतो. ही वेजिटेबल डिश थोडय़ा क्रिमी फ्लेवरने खाण्यासाठी व्हाइट सॉस असतो. येस! भारी लागतं. अशा वेळेस माझी स्वारी एकदम खूश!
व्हेजिटेबल ऑग्रातिन ही आता खूप हॉटेलात मिळणारी डिश आहे. खूपदा यात अननस पण घालतात. भाज्या बेक करतात आणि त्यावर व्हाइट सॉस आणि चीज घालतात. तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता. पण मी फारसं ‘भरपूर चीज बटर’ वाले पदार्थ खाऊ शकत नाही. डाएटवर आहे न म्हणून. पण थंडीत हेल्थ मेंटेन करण्यासाठी माझा हा आवडता पदार्थ.
चेतन गुरव :
कोलेजच्या मेन रोडवर एक प्रसिद्ध खानावळ आहे. अगदी स्वस्तात. इथे झणझणीत मिसळ आणि अमर्याद रस्सा मिळतो. त्या रश्श्याच्या आठवणीने अद्यापि जठराग्नी खवळतो. सोबत गरमागरम नरम पाव. या पावाचे मोठमोठे लचके गरमागरम रश्श्यात बुडवून डोळ्याला पाणी येईल अशा घाईघाईने मी फस्त करतो. सोबत कांदा, लिंबाच्या मोठमोठय़ा फोडी. थंडीमध्ये या चटकदार मिसळची मजा काही न्यारीच. कधी कधी कॉलेजहून निघताना हीच मिसळ मी पार्सल घरी घेऊन जातो. पण पाव हातातून नेणं कमीपणाचं वाटत असल्यामुळे गळ्यातल्या शबनममध्ये म्हणजेच एकप्रकारच्या माझ्या कॉलेजमध्ये टाकून घेऊन जातो. हा काखोटीला मारलेला पाव आणि ती चविष्ट मिसळ थंडीच्या दिवसांत रोज आठवते.
रोनक शिंदे :
सकाळी सकाळी गार हवेत मस्तपकी घरापासून कॉलेज कॅम्पसपर्यंत चालत यायचं. कॉलेजमध्ये पोहचेपर्यंत मस्त दणक्यात भूक लागलेली असते. मग मित्राची गाडी काढून थेट आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पाव-भाजी खाण्यासाठी नंबर लावायचा. थंडीच्या दिवसांतला हा आमचा रोजचा दिनक्रम. आमच्याच आवडत्या पाव-भाजी स्पेशल रेस्टोमध्ये खवय्ये गर्दी करत असल्यामुळे दाटीवाटीमध्ये बसून खास पुणेरी मसाला असलेली पाव-भाजी समोर मागवायची सोबत कांदा, कोिथबीर, शेव, ताजे खमंग वासाचे पाव! घास घेतल्यावर आमचा आवाज फुट्नच बंद होतो. काही भुक्कड मित्र इथे जास्तीची शेवही मागवतात, पण त्यात काही अर्थ नाही! इथे फक्त रस्सा आणि र्ती मागवणारेच अस्सल खवय्ये मानले जातात. ही स्वर्गीय पाव-भाजी संपेपर्यंत भलेभले स्वर्गीय होतात!!! बोलायचं कामच नाही..! मग रेस्टो. च्या बाजूचाच फेमस मिठाई च्या शेजारी असलेल्या टपरीवरचा गरम चहा..!