हेअर स्टाईल आपल्या व्यक्तिमत्त्वात, सौंदर्यात मोलाची भर घालत असतात. कितीही छान ड्रेस अप, मेक-अप केला आणि केस व्यवस्थित केलेले नसतील, अस्ताव्यस्त असतील, निष्तेज असतील तर त्या सगळ्या सजण्याची रयाच जाते. चार- चौघीत उठून दिसायचं असेल तर बालों का कुछ करना पडेगाही. हेअर स्टाईल ही फक्त लग्नसमारंभात करायची मोठी गोष्ट राहिली नाही. साधी वेणीच जरा वेगळ्या स्टाईलनं घातली तरी छान दिसते. दर वेळी पार्लरमध्ये जाऊन किंवा हेअर एक्पर्टकडे जाऊनच हेअर स्टाईल करायला लागते, असंही नाही. तुमच्या तुम्हीसुद्धा काही वेगळ्या केशरचना करू शकता. अशाच काही हटके हेअरस्टाईल्सविषयी फियामा डि वेल्सच्या हेअर स्टाईल एक्सपर्ट प्रिसिला कॉर्नर यांनी सांगितलं. क्लास्प्स, फ्लोलर बँड्स, रिबन्स, बो, हॅट्स, हेडबॅंड्स, नियॉन स्नॅप क्लिप्स अशा अॅक्सेसरीजचा वापर करून केशरचना कशा करता येतात याची त्यांनी माहिती दिली.
स्लिक सायडेड पोनीटेल..
हा फुलांचा गजरा आपल्या पारंपरिक गजऱ्यासारखा नाही, तर थोडा आधुनिक खोटय़ा फुलांचा गजरा असतो. केसांचा एका बाजूला भांग पाडा. मुख्य स्विप/भागापासून एक लहानशी बट वेगळी काढा. कंगवा मागे फिरवून अस्ताव्यस्त मिल्कमेड ब्रिड(वरच्या बाजूला वेणी) घाला, हलका स्प्रे मारा आणि फुलांच्या सुंदर गजऱ्याने सजवा.
हा संध्याकाळ किंवा दिवसाच्या पार्टीसाठीही उत्तम लुक असू शकतो. हा लुक तुमच्या हेड बँडच्या निवडीवर अवलंबून असतो. केसांना पॅडल ब्रशने सरळ ब्लोआऊट दिला जातो. मग पेस्टल / फिक्या छटांमधली वेलवेटची किंवा सॅटिनची रिबीन लावून केस सेट करा. मोकळ्या केसांसोबत किंवा एका बाजूला पोनीटेल बांधुन रिबीन लावा.
ताणला जाणारा हेअरबँड निवडा. वाळललेल्या केसांमधुन कंगवा फिरवून, हेयरबँड डोक्यात बसवा, एका बाजूने हळूहळू केस इलॅस्टिकमध्ये घालून मानेच्या मागचा भागावर केवळ हेयरबॅंड
घाला. हा उलट्या रोलप्रमाणे दिसला पाहिजे. पोल्का डॉट्स / जिओमॅट्रिक्स / फ्लोरल िपट्र्स असलेले हेअरबॅंड्स रेट्रो लुक मिळवण्यासाठी वापरा. रेट्रो लुक असला तरी पसरलेल केसांचे व्हॉल्युम टेक्श्चर, स्टाईल कंटेंपररी ठेवते.