भडक रंग म्हणून नाक मुरडल्या जाणाऱ्या रंगाचे कपडे आणि अॅक्सेसरीजची सध्या हॉट फेव्हरेट ट्रेंड आहे. प्रत्येक पर्सनॅलिटीला सूट होतील असे हे स्टड्स. प्रत्येक कलर तसेच वेगवेगळ्या शेप्स आणि साइजमध्ये उपलब्ध आहेत. प्लॅस्टिक, रबर, मेटालिक असे प्रकार यात आहेत. प्लेन टी शर्ट-जीन्स आणि नीऑन स्टड्स असा थोडासा रॉकस्टार लूक ट्राय करायला हरकत नाही!
यूएसपी : कलरफूल
किंमत : १५ ते ३० रुपये
ठिकाण : भुलेश्वर
ब्रँडेड खरेदी करण्यासाठी इनऑरबिट मॉलमध्ये गेलो असताना हा जरा हटके टॉप सापडला. प्लेन असला तरी त्याच्या पीटर पॅन स्टाईलमुळे तो खूपच वेगळा वाटला. कुठल्याही कलर किंवा डेनिम्सवर किंवा ब्लॅक ट्राऊझर किंवा लेगिंग्जवर उठून दिसणारा टॉप जॉर्जेटमध्ये असल्याने रीच वाटतो. स्कर्टवरसुद्धा खूपच सुंदर दिसू शकतो. कॉलेजमधल्या कुठल्याही फंक्शनमध्ये उठून दिसायला, पार्टीमध्ये घालून जायला आयडियल.
यूएसपी : जॉर्जेट मटेरिअल आणि ट्रेंडी फॅशन
किंमत : १७९९ रुपये
ठिकाण : एएनडी स्टोअर,
इनऑरबिट मॉल, मालाड
ओरिजनल बांबूपासून बनवलेली ही हलकीफुलकी बॅग वेगळी वाटते. सिम्पल हॅण्ड बॅग असली तरीही आपण कोणत्याही ड्रेसवर किंवा साडीवर बाहेर घेऊन जाऊ शकतो आणि तरीही त्यातून छान फॅशन स्टेटमेंट निर्माण होऊ शकते. ही बॅग रोजच्या वापरासाठी आणि रफ-यूजसाठी चांगली आहे. डिझाइन साधं तरीही आकर्षक असल्याने छान वाटते.
यूएसपी : बांबूचे सिम्पल डिझाइन
ठिकाण : लोकपुरम शॉपिंग कॉम्प्लेक्स, ठाणे (पश्चिम)
किंमत : २०० रुपये
सध्याच्या सणासुदीच्या दिवसात थोडा फेस्टिव्ह लूक येण्यासाठी साध्याशा ड्रेसवरसुद्धा सिल्क स्टोल किंवा ओढणी घेतली की त्याचा लूक एकदम बदलतो. या बनारसी सिल्कच्या ओढण्या प्लेन आणि चेक्स मधे वेगवेगळया रंगात उपलब्ध आहेत. या ओढण्या तुम्ही कुडत्यावर किंवा ड्रेस वर मिकस अँड मॅच करून घेऊ शकता. दुकानदार ही ओढणी प्युअर सिल्कची असल्याचा दावा करतो. पण ती प्युअर सिल्क आहे की नाही यापेक्षा ती छान आहे आणि अगदी उपयुक्त आहे ही गोष्ट खरी.
यूएसपी – रंगीबेरंगी फेस्टिव्ह लूक
ठिकाण – गावदेवी, ठाणे पश्चिम
किंमत – २०० ते २५० रुपये
कुठल्या फंक्शनच्या खास खरेदीच्या उद्देशाने बाहेर पडला असाल, तर अशा प्रकारचा खास फेस्टिव्ह लूक असलेला मोत्याचा नेकलेस नक्कीच डोळ्यात भरतो. नेहमीच्या दागिन्यांच्या दुकानाऐवजी हा दिसला मॉलमध्ये. पण मोती आणि यलो मेटलच्या सुंदर कलाकारीने तो मनात भरला. झुमके आणि चोकर स्टाईल नेकलेस हे दिवाळीबरोबरच आगामी वेडिंग सीझनसाठी सुंदर कॉम्बिनेशन ठरेल.
यूएसपी : फेस्टिव्ह मोती
ठिकाण : शॉपर्स स्टॉप, अंधेरी
किंमत : ३९९० रुपये