‘त्याची’ लागते चाहूल.. मन होतं कावरंबावरं.. ‘त्याच्या’ एकेका थेंबानं.. सगळे होतात निवांत.. मग ‘तो’ कोसळतो.. सरसर.. झरझर.. ‘विथ म्युझिक’ धडाऽमधूम.. कडाऽऽडकड.. सकाळपासून रात्रीपर्यंत ? २७ बाय ७.. विरघळत राहतो आपण सारे ‘त्याच्या’ त्या बसरण्यात.. ओलेचिंब होऊन जातो आतूनबाहेरून.. ‘त्याच्या’ येण्याचं होतं दणक्यात सेलिब्रेशन.. खादाडीचे, फिरस्तीचे, गाण्यांचे, गप्पांचे नाना बेत होतात.
‘तो’ एन्जॉय करण्याचे फंडे शेकडय़ानं असतात.. पण या चार महिन्यांचा यूएसपी एकच.. फक्त ‘तो’! अस्तित्वानं ‘त्याच्या’ कवितांची होते बरसात.. ‘त्याच्या’मुळं होतं मोकळं मन.. जो तो पळतो डोंगरदऱ्यांत.. वाटतं तिथं एकदम रिफ्रेिशग.. ती हिरवाई डोळ्यांत सामावत अनेकजण वर्षभराची एनर्जी साठवतात. मग कोणकोणत्या आठवणी दाटून येतात.. कागदी होडय़ांच्या.. तडतडणाऱ्या भुट्टय़ाच्या.. एका छत्रीच्या.. त्या आठवणींनीच चिंब होत मनं होतात गच्च.. तेवढय़ात पुन्हा ‘तो’ येतोच.. नेहमीसारखाच भरभर.. त्यात भिजभिजून ‘आपण’ होऊन जातो ‘तो’ आणि मग गाणं फुलतं.. ‘मन ‘पाऊस पाऊस..’
काही ‘पाऊसप्रेमीं’नी आपापल्या ‘पाऊसगप्पा’ ‘व्हिवा’शी शेअर केल्यात.
अंकिता नरोडे
प्रियांका श्रोत्री
विपुला कीर-तोडणकर
मृण्मयी मुजुमदार
मनीषा कुलकर्णी
आदिती वाळिंबे