महेश मांजरेकर दिग्दर्शित अनेक चित्रपटांतून प्रमुख भूमिका साकारल्यानंतर अभिनेता सचिन खेडेकर ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटातून मुख्यमंत्र्याची प्रमुख व्यक्तिरेखा साकारत असून त्याच्यासोबतच्या आणखी एका प्रमुख भूमिकेत महेश मांजरेकर झळकणार आहे. खेडेकर आणि मांजरेकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी असून लेखन अजित व प्रशांत दळवी यांनी केले आहे.
सध्याच्या राजकीय वातावरणात सर्वसामान्य माणसाचे स्थान काय आहे हे सर्वानाच माहीत आहे. परंतु अशा वातावरणात लोकांसाठी झगडणारा मुख्यमंत्री अशा पद्धतीचे कथानक असून सचिन खेडेकर लोकाभिमुख मुख्यमंत्री साकारतोय. २९ मार्च रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात हृषीकेश जोशी, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे यांच्याही भूमिका आहेत. मुख्यमंत्र्याच्या पत्नीच्या भूमिकेत अश्विनी भावे दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aajcha divas maza