काकाबरोबर देवदर्शनास निघालेल्या दोन चिमुकल्यांना भरधाव गाडीने उडविले. या अपघातात नाव्या प्रकाश सोनवणे (वय २) या मुलीचा मृत्यू झाला, तर शिरीष व सायली सोनवणे हे दोघे गंभीर जखमी झाले. गाडी चालवणारी व्यक्ती अल्पवयीन असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेत्याचा तो मुलगा आहे. अपघातानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना टीव्ही सेंटर परिसरात नागरिकांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केली.
मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. या वेळी परिसरात बराच वेळ तणाव होता. मोटारीने (एमएच २१ व्ही ५००) देवदर्शनास निघालेल्या तिघांना एकदम उडविले. या अपघातात नाव्याचा मृत्यू झाला.
गाडीचा वेग एवढा होता, की ती एका दुकानात घुसली. अपघातानंतर चालक पळून चालला होता. त्यामुळे नागरिक चिडले. काही जणांनी टीव्ही सेंटर चौकात दगडफेक केली. वाहनचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाच्या नेत्याचा मुलगा असल्याची चर्चा अपघातस्थळी होती.
पोलिसांनीही वाहनचालकाचे नाव सांगण्यास टाळाटाळ केली. नंतर तो अल्पवयीन असल्याचे पुढे आले. ज्या वाहनाने अपघात झाला, त्याचा वाहनचालक गाडीत होता. मात्र, तो गाडी चालवत नसल्याचे सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2013 रोजी प्रकाशित
भरधाव मोटारीने चिरडले; मुलगी ठार, दोघे जखमी
काकाबरोबर देवदर्शनास निघालेल्या दोन चिमुकल्यांना भरधाव गाडीने उडविले. या अपघातात नाव्या प्रकाश सोनवणे (वय २) या मुलीचा मृत्यू झाला, तर शिरीष व सायली सोनवणे हे दोघे गंभीर जखमी झाले. गाडी चालवणारी व्यक्ती अल्पवयीन असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या नेत्याचा तो मुलगा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-04-2013 at 02:35 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accident of car girl died two injured