आयपीएल आणि मराठी चित्रपटसृष्टी यांत गेल्या काही दिवसांपासून भलतीच ‘कनेक्शन’ असल्याच्या बातम्यांनी संपूर्ण मनोरंजनसृष्टी हादरून गेली आहे. या बातम्या खऱ्या ठरतील किंवा नाही, पण ‘भुताचा हनिमून’ हा मराठी चित्रपट आणि आयपीएल यात मात्र एक ‘कनेक्शन’ आहे. या चित्रपटातील एका आयटम साँगमध्ये असलेली नर्तिका अमृता मांडवीकर नावाची मराठमोळी मुलगी ‘पुणे वॉरिअर्स’ या संघाची चिअरलीडर होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भरत जाधव आणि रुचिता जाधव यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘भुताचा हनिमून’मध्ये ‘तराट लोकांचा विराट मोर्चा’ हे आयटम साँग आहे. प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि भारती मढवी यांनी गायलेल्या या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन बॉलिवूडमधील नृत्य दिग्दर्शक राजू वर्गीस यांनी केले आहे. या गाण्यातील दिलखेच नृत्यासाठी राजू वर्गीस यांनीच अमृताची निवड केल्याचे दिग्दर्शक राज मोहिते यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. अमृताचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta madvikars item song in bhootacha hanimoon