‘ती’ मृत्यूशी झुंज देत असताना तिच्यासाठी देशभरातील तरुणाई रस्त्यावर आली.. पंधरा दिवसांची मृत्यूशी झुंज संपली.. तिच्या मृत्यूनंतर जनक्षोभाची आणखी एक आवृत्ती झाली. मेणबत्ती मार्च निघाले, वृत्तवाहिन्यांवर महाचर्चा रंगल्या.. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी अपराध्यांना कसे कठोर शासन दिले पाहिजे, यावर मतेमतांतरे हिरिरीने मांडली.. पण, हे तेवढय़ापुरतेच होते.. तिच्याविषयी टीव्ही वाहिन्यांवर सहानुभूती दाखवणाऱ्यांना लगेच तिचा विसर पडला आणि थर्टी फर्स्टच्या रात्री हीच बेधुंद तरुणाई हॉटेल्स, पब्ज, रेस्टॉरंटमध्ये बेधुंद होऊन नाचली..
रस्त्यावर कॅण्डल मार्च करणाऱ्या याच गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डने बडय़ा हॉटेलांमध्ये ‘कपल बुकिंग’ आवर्जून केले. दोन हजार ते पाच हजार रुपये उडविणे त्यांच्यासाठी कोणतेच नावीन्य नव्हते.. रईस बापजाद्यांची मुले-मुली बापाची कमाई ‘थर्टी फर्स्ट’वर उधळण्यात स्वत:ला धन्यता मानून घेत राहिली.
‘ती’ मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर हॅपी न्यू इअरचा जल्लोष कुठेही कमी झाल्याचे दिसत नव्हते. वृत्तवाहिन्यांच्या माईकपुढे बोलताना आम्ही नववर्ष साजरे करणार नाही, असे सांगणारे ‘मॉडर्न युथ’ रस्त्या-रस्त्यांवर बाईकवरून तिबलसिट पोलिसांच्या डोळ्यादेखत सुसाटपणे निघून गेले. मद्याचे प्याले रिचवले गेले. करमणुकीच्या नावाखाली पंचतारांकित हॉटेलांमध्ये रंगलेले विदेशी नृत्यांगनांचे अंगविक्षेप पाहण्यासाठी आंबटशौकिनांची एकच गर्दी उसळली. सामूहिक बलात्काराच्या घटनांत वाढ होत असल्याच्या वार्ता येत असतानाही रात्री-बेरात्रीपर्यंत गर्लफ्रेण्ड त्यांच्या बॉयफ्रेण्डसमवेत थर्टी फर्स्ट एन्जॉय करत राहिल्या आणि त्यांच्या घरच्यांनी परवानगीसुद्धा दिली.. ‘ती’च्याबाबत जे घडले ती वेळ आपल्यावर येऊ नये, याची काळजी घेण्यापेक्षा स्वत:भोवतीचे संकट आणखी गडद करून घेणाऱ्या संस्कृतीतील ‘मॉडर्न गर्ल’ बिनधास्त पब्जमध्ये नाचत राहिल्या.. कुठे गेली ती सहानुभूती? का पडला विसर? या प्रश्नांची उत्तरे तरुणाईजव़ळ नव्हती..
कारण त्यांना फक्त एन्जॉय करणे माहीत आहे, गाडय़ा उडवणे, रात्री-अपरात्रीपर्यंत पब्जमध्ये थिरकणे यातून त्यांना बाहेर पडायचे नाही कारण भल्याबुऱ्याची चाड नसलेली, लहान-थोरांचा मुलाहिजा न ठेवणारी ही अत्याधुनिक पिढी आहे आणि ती खूपच फास्ट आहे..
संग्रहित लेख, दिनांक 1st Jan 2013 रोजी प्रकाशित
आणि ‘ती’चा विसर लगेच पडला..
‘ती’ मृत्यूशी झुंज देत असताना तिच्यासाठी देशभरातील तरुणाई रस्त्यावर आली.. पंधरा दिवसांची मृत्यूशी झुंज संपली.. तिच्या मृत्यूनंतर जनक्षोभाची आणखी एक आवृत्ती झाली. मेणबत्ती मार्च निघाले, वृत्तवाहिन्यांवर महाचर्चा रंगल्या.. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी अपराध्यांना कसे कठोर शासन दिले पाहिजे, यावर मतेमतांतरे हिरिरीने मांडली.. पण, हे तेवढय़ापुरतेच होते.. तिच्याविषयी टीव्ही वाहिन्यांवर सहानुभूती दाखवणाऱ्यांना लगेच तिचा विसर पडला आणि थर्टी फर्स्टच्या रात्री हीच बेधुंद तरुणाई हॉटेल्स, पब्ज, रेस्टॉरंटमध्ये बेधुंद होऊन नाचली.. रस्त्यावर कॅण्डल मार्च करणाऱ्या याच गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डने बडय़ा
First published on: 01-01-2013 at 03:22 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And we forgot her