शहरात एकाच वेळी चार मोटारसायकलींच्या चोऱ्या झाल्याची नोंद पोलिसांकडे झाली आहे. मोटारसायकलींच्या वाढत्या चोऱ्यांच्या गुन्हय़ांवर आळा घालण्याचे पोलिसांसमोरील आव्हान कायम आहे.
मागील २०१२ या वर्षांत ३३५ मोटारसायकलींच्या चोऱ्या झाल्या असून, त्यापैकी केवळ ५५ मोटारसायकली हस्तगत करणे पोलिसांना शक्य झाले आहे. या पाश्र्वभूमीवर मोटारसायकलींच्या चोऱ्या हा चिंतेचा विषय ठरला असताना गेल्या दोन दिवसांत पुन्हा चार मोटारसायकली चोरीला गेल्या. दीनानाथ भीमराव बाबर (वय ४०, रा. कनिष्कनगर, जुळे सोलापूर) यांची हीरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल शनिवार पेठेतील पेंटर चौकातून चोरीला गेली. म. इसाक इब्राहिम शेख (वय ५७, रा. न्यू पोर्टर चाळ, रेल्वे लाईन्स, सोलापूर) हे आपल्या घरासमोर स्वत:ची मोटारसायकल उभी केली असताना अज्ञात चोरटय़ाने हॅन्डल लॉक तोडून मोटारसायकल लंपास केली. प्रवीण नागनाथ बेंजरपे (वय ३०, रा. वंृदावन अपार्टमेंट, होटगी रोड, सोलापूर) यांची हीरो होंडा मोटारसायकल त्यांच्या घरासमोरून चोरटय़ांनी चोरून नेली. तर प्रेम गंगाराम तिरेकर (रा. कन्ना चौक, जोडभावी पेठ) यांनी जुन्या बोरामणी नाक्यावर लावलेली मोटारसायकल चोरटय़ांनी लंपास केली.