विहारासाठी निघालेल्या साध्वीसह एका भाविकाचा सांगली येथे अपघाती मृत्यू झाला. महासतीजी साध्वीसौम्याजी (वय ४० रा. साचेर, राजस्थान) असे साध्वीचे नाव आहे. तर अभय महेंद्र तेजानी (वय ३२ रा. रतनसिंगनगर, सांगली) असे भाविकाचे नाव आहे. या अपघातात अन्य पाच जण जखमी झाले आहेत.    
साध्वी सौम्याजी यांचा सांगलीमध्ये मुक्काम होता. त्या रविवारी कोल्हापूरला पायी प्रवासासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यांच्या समवेत नऊ भाविकांचा जथ्था होता. हे सर्व जण सांगलीमार्गे कोल्हापूरला येत होते. कोल्हापूर नाका येथे आल्यावर त्यांना मिनी पिकअप व्हॅनने धडक दिली. ती इतकी जबरदस्त होती, की सौम्याजी व तेजानी हे दोघे जण जागीच ठार झाले. या प्रकरणी पोलिसांनी वाहनचालक महावीर आप्पासाहेब पाटील (रा.कळंबे, ता.मिरज) याला अटक केली असून एम.एच.११.टी-७२६५ ही व्हॅन ताब्यात घेतली आहे.    
अपघातातील जखमींचे नावे- सागर अरुण जाधव (वय ३२, रा. आझाद चौक, सांगली), सुशील रमेश मेहता (वय ३४), वीरूलाल जाट (वय ५०, रा. राजस्थान), हितेश पुरमिया (वय ३० रा.सांगली), अमित पारेख (वय ३४, रा.सांगली), निर्मल चोरडिया (वय ४४, रा. सांगली), प्रदीप बाफना (वय ४६, सांगली)