चादरी खरेदी करण्यावरून झालेल्या बाचाबाचीत परप्रांतीय दुकानदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यावर चाकूने वार केला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास साकुरी शिवारात नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला घडली. राहाता पोलिसांनी यासंदर्भात पाचजणांना अटक केली. या आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
गोकुळ मोगले हे हल्ल्यात जखमी झाले आहेत. मनसेचे शिर्डी शहराध्यक्ष विजय मोगले यांचे ते भाऊ आहेत. यासंदर्भात पोलिसांनी लालू गफ्फार अन्सारी (वय २०), रफीक गफ्फार अन्सारी (१९), शकीक अहमद अन्सारी (२२, तिघेही राहाणार उत्तर प्रदेश), सुनील दत्तात्रय वाणी (३०) व योगेश सर्जेराव वेळंजकर (२४, दोघेही राहाणार साकुरी, तालुका राहाता) या पाच जणांना अटक केली आहे. ही हाणामारी सुरू असताना मोटा जमाव जमला होता. राहाता व शिर्डी पोलीस तसेच शिर्डी येथील दंगल नियंत्रण पथकाने लाठीमार केल्याने जमाव पांगल्याने ताणाव निवळून पुढील अनुचित घटना टळली. विजय मोगले यांच्या फिर्यादीवरुन राहाता पोलिसांनी सात ते आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. जखमी गोकुळ मोगले यांच्यावर शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात उपचार चालू आहे. यापूर्वीही या परप्रांतिय व्यावसायिकांबरोबर मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामाऱ्या झालेल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 16th Jul 2013 रोजी प्रकाशित
परप्रांतीय फेरीवाल्यांकडून चाकूहल्ला
चादरी खरेदी करण्यावरून झालेल्या बाचाबाचीत परप्रांतीय दुकानदाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यावर चाकूने वार केला.

First published on: 16-07-2013 at 01:50 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on mns activist by outsider hawker