नगरपरिषदेच्या निष्क्रीय व नियोजनशून्य कारभारामुळे जिल्हा मुख्यालयाच्या आठवडी बाजाराला बकाल स्वरूप आले आहे. हा आठवडी बाजार आहे की, डंम्पिंग ग्राऊं ड, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
बाजारात ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग, कापलेल्या क ोंबडय़ा व बकऱ्यांच्या मांसाचे अवशेष, सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य व दरुगधी, मोकाट जनावरे व डुकरांचा सुळसुळाट, प्रसाधनगृहाची गैरसोय यामुळे परिसरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. भाजीपाला व्यापारी व नागरिक त्रस्त झालेले असतांना बाजार कर वसुल करणारी नगरपरिषद मात्र उपाययोजनांच्या संदर्भात निष्क्रियतेचा कळस गाठत आहे. यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आहे.   
जिल्ह्य़ाचे मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो. शहर व परिसरातील हजारो नागरिक व भाजीपाला विक्रे ते या बाजारात येतात. शिवाय, दर दिवशी या ठिकाणी बाजार भरतो. परंतु, गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आठवडी बाजाराला बकाल स्वरूप आले आहे. आठवडी बाजाराची नियमित साफसफाई होत नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सांडपाणी व कापलेल्या क ोंबडय़ा, बकऱ्यांच्या मांसाचे अवशेष ठिकठिकाणी विखुरलेले दिसतात. त्यामुळे सर्वत्र दरुगधी पसरली आहे. प्रसाधनगृहे नसल्याने घाणीच्या साम्राज्यात अधिकच भर पडली आहे. हीच अवस्था महात्मा फुले मार्केटचीही झाली आहे. अनेक नागरिक या मार्केटचा लघुशंकेसाठी वापर करीत आहेत. कचरा व घाण पाण्याच्या डबक्यात डुकरे मुक्त संचार करीत आहेत. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना या ठिकाणी व्यवसाय करणे कठीण झाले आहे.  नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोणातून आठवडी बाजाराची नियमित साफसफाई करून कचरा टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा, प्रसाधनगृहासह पिण्याच्या पाण्याची सुविधा करावी, टिनसेट व ओटय़ाची दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागण्या नागरिकांनी केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buldhana week market or garbage depo