राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन् यांसह इतर बारा राज्यांतील निवडणूक आयुक्त बुधवारी येथे आयोजित निवडणूकविषयक शिबिरास उपस्थित राहणार आहेत.
मानस रिसॉर्ट येथे हे शिबीर होणार आहे. या शिबिरात नीला सत्यनारायणन् या इतर राज्यांतील निवडणूक आयुक्तांना महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती अभियानाबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती तहसीलदार गोविंद शिंदे यांनी दिली. सत्यनारायणन् या घोटीतील साधना वाचनालयाच्या वतीने आयोजित महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रशिक्षण शिबिरालाही मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील मतदानाची कार्यप्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्र, याविषयी शिबिरात चर्चा होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2012 रोजी प्रकाशित
इगतपुरीत आज निवडणूक आयुक्तांचे शिबीर
राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन् यांसह इतर बारा राज्यांतील निवडणूक आयुक्त बुधवारी येथे आयोजित निवडणूकविषयक शिबिरास उपस्थित राहणार आहेत. मानस रिसॉर्ट येथे हे शिबीर होणार आहे.
First published on: 19-12-2012 at 02:34 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Camp by election commissioner in igatpuri