इन्स्टिटय़ूट फॉर यूथ अॅन्ड सोशल वेल्फेअर या सामाजिक संस्थेतर्फे नुकताच बाल अधिकार मेळावा आयोजित करण्यात आला. बालकांच्या विविध अधिकारांसाठी जनजागृतीच्या उद्देशाने पथनाटय़, गाणी इत्यादींद्वारे बाल कामगारांना प्रतिबंध, लिंग भेद न मानने, पर्यावरण संरक्षण, शिक्षण मुलांचे अधिकार या विषयावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
 सामाजिक कार्यकर्त्यां लीलाताई चितळे यांनी उद्घाटन केले. यावेळी मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव रंजना पवार होत्या. बिना सुनकर, बाल हक्क अभियानाचे राजेंद्र मेश्राम, प्रकल्प समन्वयक विनायक नंदेश्वर आणि कृष्णकांत तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Come togather for against childrens atrocity