लातूर महापालिकेच्या पहिल्या आकृतिबंधास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. आमदार अमित देशमुख यांनी या संदर्भात केलेल्या प्रयत्नाला यश आले.
महापालिकेत आता ४० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १ हजार ३६५ कर्मचारी राहणार आहेत. लातूर शहराला मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा आकृतिबंध सोमवारी फारसा बदल न करता मंजूर केला. लातूर शहराचे पाच विभाग करून तेथे स्वतंत्र क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. या कार्यालयात विभागनिहाय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, पर्यावरणसंवर्धन अधिकारी, सुरक्षा अधिकारी, ७ सहायक प्रभारी अधिकारी, मूल्यनिर्धारक, करसंकलन अधिकारी, पाच अधीक्षक, ११ सचिव, नगरसचिव, प्रशासन मुख्य लेखा, लेखापरीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी असे ४० वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होणार आहेत. स्थापत्य व पाणीपुरवठा असे दोन अभियंते मिळणार आहेत. स्थापत्य शाखेत ५ उपअभियंते, ५ शाखा अभियंते, ५ कनिष्ठ अभियंते, ४ सहायक, ५ लिपिक, ५ शिपाई असा कर्मचारीवर्ग राहणार आहे. पाणीपुरवठा शाखेत १७जणांचा समावेश असेल.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2013 रोजी प्रकाशित
लातूर महापालिकेच्या आकृतिबंधास मंजुरी
लातूर महापालिकेच्या पहिल्या आकृतिबंधास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. आमदार अमित देशमुख यांनी या संदर्भात केलेल्या प्रयत्नाला यश आले. महापालिकेत आता ४० वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १ हजार ३६५ कर्मचारी राहणार आहेत. लातूर शहराला मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा आकृतिबंध सोमवारी फारसा बदल न करता मंजूर केला.
First published on: 10-05-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Design sanction of latur municipal corporation