व्यक्तिगत नव्हे, तर सामूहिक प्रगतीनेच समाजाची स्थिती सुधारण्याचा सल्ला माजी आमदार अरुण अडसड यांनी अखिल भारतीय दख्खन मराठी कुणबी समाजाच्या विदर्भस्तरीय स्नेहमिलन सोहळ्यात बोलतांना समाजबांधवांना दिला आहे.
वध्र्यालगत पिपरीत उभारण्यात आलेल्या समाजाच्या नव्या सभागृहात या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संख्येने लहान, पण विविध क्षेत्रात गुणवंतांची एक फ ळीच असणाऱ्या दख्खण मराठा कुणबी समाजातील संघटन शक्तीवर यावेळी अरुण अडसड यांनी भाष्य केले. सवार्ंना बरोबर घेऊन जाण्याचा सल्ला त्यांनी समाजातील मान्यवरांना याप्रसंगी प्रामुख्याने दिला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक व संघटनेचे जिल्हाप्रमुख अण्णासाहेब जाधव होते, तसेच भाजपचे जि.प.गटनेते श्याम गायकवाड, सरपंच कुमुदताई लाजूरकर, प्राचार्य भय्यासाहेब केंडे, जि.प.चे उपमुख्याधिकारी विपुल जाधव, केंद्रीय अध्यक्ष भास्कर सरोदे (यवतमाळ), सुधाकर काटे (अमरावती), सुरेश बोराडे (नागपूर), रामराव माहुरे, माधवराव मिसाळ, विनायकराव गोहो या मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी समाजनेते भास्करराव गांडोळे व प्रकाश मिसाळ यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
मुख्य कार्यक्रमात पिपरीच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा प्रथम सत्कार करण्यात आला, तसेच पीएच.डी. पदवीप्राप्त समाजबांधव प्रा.रवींद्र सोनटक्के, महेंद्र गायकवाड व राजीव जाधव, नवनिर्वाचित सरपंच, दहावी व बारावीतील आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत, राज्यस्तरावर चमकणारे कला, क्रीडा क्षेत्रातील खेळाडू व कलावंतांचा शाल-श्रीफ ळ देऊन सत्कार करण्यात आला.
गुणवंतांना रोख पुरस्कार व भेटवस्तू अडसड यांच्या हस्ते देण्यात आल्या. याचप्रसंगी समाजातील विवाहेच्छूक तीस मुला-मुलींचा परिचय करून देण्यात आला. समाज संघटनेच्या आर्थिक उलाढालीचा गोषवारा रमेश कहाते यांनी सादर केला. जिल्हा सचिव जयंत भालेराव यांनी पुढील उपक्रमांची माहिती दिली.
महिला पदाधिकारी प्रा.डॉ.प्रतिभा सावध, प्रा.डॉ.कल्पना लांडगे व प्रा.रेखा अडसुळे यांनी विविध सत्रांचे संचालन केले.
विदर्भभरातून आलेल्या प्रतिनिधींच्या प्रशस्तीस पात्र ठरलेल्या या सोहळ्याच्या आयोजनात सुरेंद्र सावध, मोहन मिसाळ, शिरीष जाधव, संजय शेळके, कृष्णराव दिवटे, वामन तरासे, उत्तम जंगले, उत्तम गांडोळे, उत्तम करांगळे, प्रभाकर नाखले आदींनी योगदान दिले.