श्रीक्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री महाबळेश्वर शिवमंदिरात सोमवारी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकशिवभक्तास प्रसाद म्हणून मोफत राजगिऱ्याचे लाडू वाटप करण्याचा आगळा वेगळा उपक्रम सुरू कण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ नुकताच श्रीक्षेत्रमहाबळेश्वर देवस्थान ट्रस्टचे प्रशासकीय पंच तथा महाबळेश्वरचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या शुभहस्ते पर्यटक भक्तांना लाडू वाटप करून संपन्न झाला. या वेळी देवस्थानचे इस्टेट मॅनेजर देवेंद्र जगताप, लिपीक बबन लांगी, सुरक्षा रक्षक दीपक धनावडे, किसन लांगी उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टच्यावतीने लाडूचा प्रसाद प्रत्येक सोमवारी प्रत्येक शिवभक्ताला दिला जाणार आहे. या प्रसादाचा शिवभक्तांनी लाभ घ्यावा. देवस्थानच्या या आगळ्या वेगळ्या व कायमस्वरुपी उपक्रमाबद्दल देवस्थान ट्रस्टचे शिवप्रेमी, पर्यटकांकडून कौतुक केले जात आहे.