इचलकरंजीतील लालनगर भागातील ९ लाभार्थीनी घरकुले ताब्यात मिळावीत, या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. लालनगर भागात ब्लॉक क्रमांक ८१ मधील ९ लाभार्थीना घरकुले देण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला होता. तथापि लाभार्थीनी वारंवार नगरपालिकेकडे पाठपुरावा करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. लाभार्थीनी मुख्याधिकारी नितीन देसाई यांना दिलेल्या निवेदनात बेमुदत उपोषणाचा इशारा चार महिन्यांपूर्वी दिला होता. तरीही नगरपालिकेने कसलीही कारवाई न केल्याने सोमवारपासून मुमताज शेख, शेवंता कदम, बंडू तळेकर, प्रकाश गंजाकुश आदी लाभार्थीनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2013 रोजी प्रकाशित
इचलकरंजीत उपोषणास सुरुवात
चलकरंजीतील लालनगर भागातील ९ लाभार्थीनी घरकुले ताब्यात मिळावीत, या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. लालनगर भागात ब्लॉक क्रमांक ८१ मधील ९ लाभार्थीना घरकुले देण्याचा निर्णय नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला होता. तथापि लाभार्थीनी वारंवार नगरपालिकेकडे पाठपुरावा करूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
First published on: 08-01-2013 at 08:35 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fasting in ichalkaranji for demand of gharkul