मान्सूनसदृश वातावरण असतानाही सलग तीन दिवस पावसाने उघडीप घेतली आहे. चार थेंब कोसळून जोमदार पावसाची अपेक्षा फोल ठरत असल्याने बळीराजा आभाळाकडे डोळे लावून आहे.  
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत  कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात १ एकूण ६६, नवजा विभागात ९ एकूण ३६, महाबळेश्वर विभागात शून्य एकूण ५१ मि. मी. तर प्रतापगड विभागात शून्य एकूण ३५ मि. मी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कृष्णा कोयनाकाठीही काही ठिकाणी हलक्या सरींचा अपवाद वगळता पावसाची उघडीपच असून, कोयना धरणाखालील पाटण तालुक्यात सरासरी २.५ एकूण ३०.५ मि. मी. तर कराड तालुक्यात १.५ एकूण २० मि. मी. पावसाची नोंद आहे. सध्या कोयना धरणाची पाणीपातळी २ हजार ७९ फू ट ४ इंच आहे. तर, १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या या शिवसागराचा पाणीसाठा ३१.४९ टीएमसी म्हणजेच ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे. गेल्या ७२ तासात धरणाचा पाणीसाठा सव्वा टीएमसीने कमी झाला आहे. दरम्यान, काल सकाळपासून धरणाच्या पायथाच्या वीजगृहातून वीजनिर्मिती थांबविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Feint of rain to karad patan taluka