ठाणे, कळवा, मुंब्रा यासारख्या शहरांमधील काही भागांमध्ये होणारी पाण्याची वारेमाप नासाडी रोखण्यासाठी तातडीने उपाय आखणाऱ्या महापालिकेने आता शहरातील सुमारे ८०० कूपनलिका दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रातील बहुतांश कूपनलिकांमधील पाण्याचा वापर अग्निशमन केंद्र, रुग्णालये, शाळा, उद्यानांच्या देखभालीसाठी होत असतो. वर्षांनुवर्षे देखभाली अभावी रडतखडत सुरू असलेल्या या कूपनलिकांची युद्धपातळीवर दुरूस्ती करण्याचा निर्णय अभियंता विभागाने घेतला आहे.
ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये महापालिकेच्या सुमारे ८०० कूपनलिका आहेत. त्यापैकी ७२५ कूपनलिका हातपंपासहित आहेत. या कूपनलिकांचा वापर मोठय़ा प्रमाणावर होत असतो. पाणी टंचाईच्या काळात सार्वजनिक ठिकाणी रहिवाशांकडून या कूपनलिका वापरात आणल्या जातात, असा अहवाल पाणी पुरवठा विभागाने सादर केला आहे. ७५ कूपनलिका या विद्युत पंपासह असून त्याचा उपयोग उद्यान विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या उद्यानांच्या देखभालीसाठी होत असतो. मात्र, यापैकी बऱ्याच कूपनलिका बंद असल्याने उन्हाळ्यात उद्यानांची देखभाल करताना महापालिकेच्या नाकीनऊ येतात. पुरेसे पाणी मिळत नसल्याने उद्यानाची दुरावस्था होत असल्याच्या तक्रारी आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात अग्निशमन केंद्र, रुग्णालये, शाळा तसेच काही कार्यालयांमध्येही कूपनलिकांद्वारे पाणी देण्यात येते. उन्हाळ्याच्या दिवसात हातपंप दुरूस्तीविषयी नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.
या पाश्र्वभूमीवर या सर्व कूपनलिकांची युद्धपातळीवर दुरूस्ती करण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतला असून त्यासाठी सुमारे २० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. विद्युत पंपासह उभारण्यात आलेल्या सुमारे ७५ कूपनलिकांची दुरूस्ती पूर्ण झाल्यास उद्यानांना होणाऱ्या पाणी पुरवठय़ाचा प्रश्न निकाली काढता येऊ शकतो, असा दावाही पाणी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
ठाण्यातील उद्यानांना मिळणार भरपूर पाणी
ठाणे, कळवा, मुंब्रा यासारख्या शहरांमधील काही भागांमध्ये होणारी पाण्याची वारेमाप नासाडी रोखण्यासाठी तातडीने उपाय आखणाऱ्या महापालिकेने आता शहरातील सुमारे ८०० कूपनलिका दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-11-2012 at 04:23 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Full water for garden in thane city