खाद्यपेयांवरील अन्यायकारक दुहेरी कर आकारणीला विरोध म्हणून खाद्यगृहे सोमवारी २९ एप्रिल रोजी बंद ठेवण्याचे आवाहन हॉटेल संघाने एका पत्रकाद्वारे केले आहे.    
पत्रकात म्हटले आहे, की खाद्यपेय विक्रीवर राज्य सरकारचा व्हॅट कर आकारला जात आहे. पुन्हा त्याच विक्रीवर केंद्र सरकारने सव्र्हिस टॅक्स आकारणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे एकाच विक्रीवरती दुहेरी करआकारणी होत आहे व त्याचा अन्यायकारक बोजा शेवटी सर्वसामान्य ग्राहकांवरती पडत आहे. हॉटेल व्यावसायिकांना हे नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने अन्यायकारक आहे, याची पूर्ण जाणीव आहे. त्याकरिता हॉटेल व्यावसायिकांच्या राज्यस्तरीय असोसिएशन्स हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, इंडियन हॉटेल अॅन्ड रेस्टॉरंट असोसिएशन आणि राष्ट्रीय स्तरावरील फेडरेशन ऑफ हॉटेल्स अॅन्ड रेस्टॉरंट ऑफ इंडिया यांनी केंद्र सरकारकडे याबाबत पुनर्विचार करावा, यासाठी विनंती केली आहे.