हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पुणे, नांदेड शहरामध्ये हज हाउस सुरू करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्याबाबत केंद्रीय हज कमिटीकडे मी पाठपुरावा करणार आहे असल्याचे राज्याचे वत्रोद्योग व अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नसिम खान यांनी शनिवारी येथे सांगितले.
कोल्हापूर जिल्हा हज कमिटीच्या वतीने हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी शासनाच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री नसिम खान बोलत होते. या वेळी हज कमिटीचे सदस्य जहाँगीर ढालाईत, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक, सुरेश कुराडे, सुरेश पाटील,गणी आजरेकर, सलिम बागवान आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2013 रोजी प्रकाशित
‘पुणे, नांदेड शहरामध्ये लवकरच हज हाउस’
हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी पुणे, नांदेड शहरामध्ये हज हाउस सुरू करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे.
First published on: 07-07-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huj house early in pune nanded city