पाण्याबाबत लोकप्रतिनिधी, नागरिकांमध्ये जलसाक्षरता निर्माण व्हावी, पाण्याचे महत्त्व व संस्कृती जनमानसांपर्यंत पोहोचावी यासाठी १९ व २० जानेवारी रोजी कोल्हापुरात जलसाहित्य संमेलन होणार आहे. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या आठव्या जलसाहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ.चंद्रकुमार नलगे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेची रूपरेषा याप्रमाणे. १९ जानेवारीला सकाळी जलकलश दिंडी, १० वाजता उद्घाटन सोहळा, दुपारी जलसाक्षरतेवरील अभिनव प्रयोग, सायंकाळी जल कविसंमेलन व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. तर दुसऱ्या दिवशी मान्यवरांच्या प्रकट मुलाखती व समारोप होणार आहे. परिषदेसाठी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ पाटील, श्रीमंत शाहूमहाराज, जलतज्ज्ञ माधवराव चितळे, डॉ.दत्ता देशकर, अरूणा साबळे, महाराष्ट्र सिंचन परिषदेचे अध्यक्ष ती.बा.मोरे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.जे.पवार, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, कवी विठ्ठल वाघ यांचा समावेश आहे.