येथील मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारे राजमाता जिजाऊ पुरस्कार दीपा साबळे, शहाजीराजे क्रीडा पुरस्कार सुनील ढगे यांना, तर शाहूमहाराज समाजभूषण पुरस्कार नितीन तावडे यांना मान्यवरांच्या हस्ते सोमवारी प्रदान करण्यात आले.
एम. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली हे वितरण झाले. आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार ओमप्रकाश राजेिनबाळकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास िशदे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सतीश दंडनाईक, नगरसेवक सोमनाथ गुरव, डॉ. सुभाष वाघ व प्रा. भालचंद्र जाधव यांची उपस्थिती होती. आमदार पाटील व राजेिनबाळकर यांची भाषणे झाली. या प्रसंगी डॉ. ऊर्मिला गजेंद्रगडकर, तृप्ती अंधारे, कमल नलावडे, शोभा गायकवाड, शीला नाईकवाडे, धनश्री सस्ते, पवित्रा सुरवसे, अश्विनी मोहिते यांचा गौरव करण्यात आला. समितीने आयोजित केलेल्या ‘रन फॉर वुमन्स सेफ्टी’ मॅरेथॉनमधील विजेत्या सारिका काळे, तसेच निकिता करंडे, मोनिका सोनवणे, राजश्री कोळगे व श्रुती मुळे यांचाही सत्कार करण्यात आला. मधुकर अनभुले यांनी प्रास्ताविक, कवी माधव गरड यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अग्निवेश िशदे, समितीचे अध्यक्ष रोहित बागल, अजिंक्य गुंजाळ, विजयकुमार पवार, पंकज पाटील, रोहित पडवळ आदींनी परिश्रम घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jijau anniversary award distribution osmanabad