भारताचा विकास करण्यासाठी चांगल्या वाड.मयची आवश्यकता आह़े  तसेच देशाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आजच्या साहित्यिकांवर आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसेवा शिक्षणप्रुखम गुणवंतसिंह कोठारी यांनी व्यक्त केल़े.  रा़ स्व़ संघ जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) यांच्यावतीने बोरिवलीतील कच्छी सवरेदय ट्रस्टवाडी येथे  ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान सोहळा पार पडला. यात कोठरी प्रमुख वक्ते होत़े  या सोहळ्यात सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेला सेवा क्षेत्रातील आणि प्रसिद्ध साहित्यिक अच्युत गोडबोले यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कर पदान करण्यात आला़   एक लाख रुपयांचा धनादेश, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होत़े  या वेळी समितीचे राज्यातील अध्यक्ष रवींद्र साताळकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ़ शिरीष गोपाळ देशपांडे, समितीचे स्वागताध्यक्ष वासुदेव कामत आदी मान्यवर उपस्थित होत़े

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Literaturist having responsibility to guide nation