शहर व परिसरात विविध संस्था, विद्यालय, महाविद्यालय, संघटना यांच्या वतीने प्रतिमापूजन, गुणवंतांचा गौरव, मिरवणूक, वक्तृत्व स्पर्धा अशा माध्यमांतून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
जय जनार्दन स्वामी विद्यालय
नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या अमृतधाम येथील शाळा क्र. ६५, जय जनार्दन स्वामी प्राथमिक विद्यालयात केंद्र समन्वयक बाळासाहेब कडलग व मुख्याध्यापिका मंगला शिंदे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी कडलग यांनी माहिती दिली. मुलांनी नाटक सादर करून सर्वाना आकर्षित केले.
सुभाष वाचनालय
नाशिक येथील सुभाष सार्वजनिक वाचनालयात शिवजयंतीच्या कार्यक्रमास वाचनालयाचे कार्याध्यक्ष परमानंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी चित्रकार नारायण चुंबळे यांनी छत्रपतींचे जीवन व कार्य याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह मारुती तांबे यांनी केले. आभार प्रभाकर खंदारे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी रामदास सोनवणे, दिलीप तांबे, प्रकाश शिंदे, सुनीता वाघचौरे तसेच सभासद मोठय़ा प्रमाणावर उपस्थित होते.
बाल गौरव पुरस्कारांचे वाटप
नाशिक येथील महाराष्ट्र सांस्कृतिक ज्ञानपीठ यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बाल गौरव पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. सांस्कृतिक कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम डॉ. अजित बागमार यांच्या संस्थेतर्फे करण्यात येत असल्याचे मत या वेळी भाजपचे शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी यांनी मांडले. दीपक धारराव यांनीही मार्गदर्शन केले. शिवजयंतीनिमित्त संयोग पवार (नृत्य), सुबोधिनी पवार (अभिनय), तन्मयी पवार (संगीत), शुभम भदाणे (विद्यार्थी), मानसी देशपांडे (कला), गार्गी वैद्य (विक्रमवीर), मानसी पाटील (स्वरसम्राज्ञी), हर्ष बेदमुथा (गणित महर्षी), आकांक्षा पगार (बौद्धिकता), स्नेहल अमृतकर (वक्ता) यांना बाल गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच नृत्य, समूहगायन, पथनाटय़, समूह नृत्य, पथनाटय़, वक्तृत्व, अभिनय, गायन, सुविचार आदी स्पर्धेचे पारितोषिक वितरण बिरदीचंद नहार, लक्ष्मण सावजी, दीपक धारराव आदींच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन डॉ. अजित बागमार यांनी केले. नृत्य स्पर्धेत लहान गटात अथर्व ढोले, मोठय़ा गटात सचिन लेवे, समूह गायनात पळसेची ज्ञानदेवी गुप्ता प्रेस स्कूल, सुविचार स्पर्धेत श्रुती लोढा, पथनाटय़ स्पर्धेत पळसेचे ज्ञानदेवी गुप्ता हायस्कूल, ग्रुप डान्समध्ये नटराज कथक केंद्र यांनी प्रथम क्रमांक मिळविले.
जनसेवा वाचनालय
गोवर्धन येथील जनसेवा सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्यां नलिनी नावरेकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव, दत्तू डंबाळे, ग्रामविकास अधिकारी आय.बी. पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी किशोर जाधव होते. या वेळी पुणे विद्यापीठाच्या वतीने नावरेकर यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा वाचनालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आयटक कामगार केंद्र
शिवजयंतीनिमित्त नाशिक येथील आयटक कामगार केंद्रात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस आयटकचे राज्य सचिव राजू देसले यांनी हार अर्पण केला. या प्रसंगी राजू उदमले, भारत साळवे, एस. रोडे, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते.
मराठा सेवा संघ
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्यातर्फे नाशिक येथील मराठा मंगल कार्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष हंसराज वडघुले, केशवराव भोसले, नगरसेविका सुरेखाताई भोसले आदी उपस्थित होते.
या प्रसंगी वडघुले यांनी छत्रपतींचा सर्वसमावेशक दृष्टिकोन अंगीकारण्याची तसेच शिवरायांचा आदर्श असा मावळा आपल्यामध्ये शोधण्याची आवश्यकता व्यक्त केली.
म्हसरूळ वाचनालय
नाशिक येथील म्हसरूळ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वाचनालयाचे सहखजिनदार प्रकाश उखाडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष वसंत मोराडे यांनी शिवरायांच्या जीवन चरित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कोषाध्यक्ष विठ्ठल धनाईत यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
सामाजिक न्याय संकुल
नाशिक-पुणे रस्त्यावरील नासर्डी पुलाजवळील सामाजिक न्याय संकुलात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त राजेंद्र कलाल यांच्या हस्ते छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी साहाय्यक संचालक दिलीप झिरपे, निम्नश्रेणी लघुलेखक दिलीप भावसार, गृहपाल शशांक हिरे, जनसंपर्क अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2013 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये शिवछत्रपतींना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
शहर व परिसरात विविध संस्था, विद्यालय, महाविद्यालय, संघटना यांच्या वतीने प्रतिमापूजन, गुणवंतांचा गौरव, मिरवणूक, वक्तृत्व स्पर्धा अशा माध्यमांतून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. जय जनार्दन स्वामी विद्यालय
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 21-02-2013 at 03:53 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lots programs in nashik on shivaji maharaj