scorecardresearch

नाशिक

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
nashik pimpalgaon toll plaza accident
नाशिक: पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस अपघातात २७ प्रवासी जखमी

वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसल्याची प्राथमिक माहिती असून या जोरदार धडकेत बसमधील चालक, वाहकासह जवळपास २७ प्रवासी जखमी…

Nashik, Nashik Faces Severe Water Crisis, Heat Wave Dries Up Dams, Gangapur dam Reservoir at 28 percent Capacity, gangapur dam, nashik news,
नाशिकमध्ये गाळमिश्रित पाणी पुरवठा संभव; सहा धरणे कोरडी, जिल्ह्यातील धरणसाठा १६ टक्क्यांवर

उष्णतेच्या लाटेने संपूर्ण नाशिक जिल्हा तापला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. आतापर्यंत सहा धरणे कोरडीठाक झाली असून…

Inspection of Tejas Garge house in Mumbai nashik
तेजस गर्गेच्या मुंबईतील घराची तपासणी

ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे तत्कालीन संचालक तेजस गर्गे आणि सहायक संचालिका आरती आळे यांची नावे लाच…

structural audit of bridges and dangerous buildings
धोकादायक इमारतींसह पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण – आपत्ती प्राधिकरण यंत्रणेची सूचना

मान्सून काळातील भूस्खलन, पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे.

Two boys of class 10 died after drowning in Devnadi dam
नाशिक : देवनदी बंधाऱ्यात बुडून दहावीतील दोन मुलांचा मृत्यू

सिन्नर शहरापासून जवळच असलेल्या कुंदेवाडीजवळील देवनदी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या इयत्ता दहावीतील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला.

nashik water shortage crisis marathi news
नाशिक विभागात १५ लाख नागरिकांची टँकरवर भिस्त; ३१६१ गाव-वाड्यांना ७७८ टँकरने पाणी, ४५१ विहिरी अधिग्रहित

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालातून मे महिन्यात विभागातील टंचाईचे संकट अधिक गडद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

nashik records hottest day at 42 degrees Celsius
नाशिक तापले; पाच वर्षानंतर नाशिकचा पारा पुन्हा ४२ अंशावर

शहर परिसरात दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून नागरिक हैराण झाले आहेत.

Chhagan Bhujbals suggestion on traffic congestion in Dwarka Chowk
हाजीअली चौकातील धर्तीवर उपायांची गरज, द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर छगन भुजबळ यांची सूचना

चौकात कायम होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका चौकात उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी…

nashik st bus fire marathi news
नाशिक: वणी स्थानकात एसटी बसच्या इंजिनने घेतला पेट, प्रवासी सुखरूप

वणी स्थानकात सकाळी साडेआठच्या सुमारास नाशिकहुन कळवणकडे जाणारी राज्य परिवहन महामंडळाची पिंपळगाव आगाराची जादा बस उभी होती.

संबंधित बातम्या