महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अमरावतीअंतर्गत आयोजित आंतर मंडळ नाटय़ स्पर्धा उद्या १६ नोव्हेंबरला अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात व टाऊन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या प्रकल्प सांघिक कार्यालयाचे संचालक ओमप्रकाश एम्पाल उपस्थित राहणार आहेत. तसेच १७ नोव्हेंबरला  कंपनीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरिता मुंबईच्या प्रकल्प सांघिक कार्यालयाचे (संचालन) संचालक उत्तमराव झालटे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण व समारोप कार्यक्रम पार पाडणार आहे. सामाजिक बांधीलकी जोपासण्याच्या हेतूने अपंग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम परिमंडळातील सर्व अधीक्षक अभियंत्यांच्या हस्ते आयोजित केला आहे. तरी कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता व अध्यक्ष अ.म. कावळे, अधीक्षक अभियंता व कार्याध्यक्ष यशवंतराव गजभिये, कार्यक्रमाचे सचिव व कार्यकारी अभियंता महेंद्र कांबळे, अभय रोही यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahapareshan play act compitition stars from tomorrow