कराड अर्बन बँक सेवक संघातर्फे आयोजित राज्यस्तरीय चौथ्या खुल्या एकांकिका स्पध्रेत बोरिवली येथील मऱ्हाटी कलामंचच्या ‘२१.१२.२०१२ द जजमेंट डे’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळवून ११ हजार रूपये, फिरता करंडक व प्रशस्तिपत्रक असे बक्षीस पटकावले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात ही स्पर्धा नुकतीच झाली. स्पध्रेत सातारा, सांगली, कुडाळ, पुणे, मुंबई,अकलूज व कराड या ठिकाणच्या ३९ संघांनी भाग घेतला होता. यात कराड अर्बन बँकेच्या संचालक, सेवकांनीही एकांकिका सादर केली. स्पध्रेच्या यशस्वीतेसाठी सेवक संघाचे अध्यक्ष दिलीप चिंचकर, जगदीश त्रिवेदी, ज्योती वाघ, अर्चना चिंचणकर, राजेंद्र डोळे, रवींद्र पवार, प्रदीप हष्रे, सुनील कुलकर्णी, प्रियांका शिंदे, संतोष चव्हाण व संतोष क्षीरसागर, प्रदीप कांबळे, महादेव हजारे आदींनी परिश्रम घेतले. अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष डॉ. राजीव अहिरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी मार्गदर्शन केले. रमेश कदम, देवेंद्र देव, सोनल भोसेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पध्रेचा निकाल पुढीलप्रमाणे – (अनुक्रमे संस्थेचे नाव, कंसात एकांकिकेचे नाव व पारितोषिक )
रंगयात्रा नाटय़संस्था इचलकरंजी (भर चौकात गांधी पुतळय़ासमोर), द्वितीय क्रमांक ७५०० रूपये, फिरता करंडक व प्रशस्तिपत्र. निष्पाप थिएटर्स इचलकरंजी (जीवनसुक्त) तृतीय क्रमांक ५००० रूपये, फिरता करंडक प्रशस्तिपत्रक. सिध्दार्थ थिएटर्स कुडाळ (कातरवेळ) उत्तेजनार्थ एक-१००० रूपये करंडक व प्रशस्तिपत्रक. लोकरंगभूमी सांगली (मी मेलेला माणूस) उत्तेजनार्थ दोन-१००० रूपये करंडक व प्रशिस्तपत्रक.
वैयक्तिक बक्षिसातही ‘मऱ्हाटी’ ची बाजी- वैयक्तिक पारितोषिकामध्ये उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट पुरूष अभिनेता, उत्कृष्ट प्रकाश योजना, उत्कृष्ट पाश्र्वसंगीत, उत्कृष्ट वेशभूषा, प्रथम क्रमांकाचे पारितोषिक बोरिवली येथील मराठी कलामंचच्या ‘२१.१२.२०१२ द जजमेंट डे’ या एकांकिकेला मिळाले. उत्कृष्ट स्त्री अभिनेत्री प्रथम-संक्रमण पुणे यामिनी-साकव, १००० रूपये करंडक व प्रशस्तिपत्रक, उत्कृष्ट लेखन-रंगयात्रा नाटय़संस्था इचलकरंजी, भर चौकात गांधी पुतळय़ासमोर, ५०० रूपये, करंडक व प्रशस्तिपत्रक. उत्कृष्ट बालकलाकार-आगण पुणे, झिम्मड-थेंबाचे टपाल.