संजीवनी मित्रमंडळाच्या वतीने मराठवाडा टॅलेन्ट हंट-२०१३ या विभागीय नृत्यस्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने करण्यात आले आहे. परभणी बाजार समितीचे उपसभापती आनंद भरोसे यांच्या प्रयत्नातून १२ जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे.
स्पर्धेची सुरुवात पात्रता फेरीपासून होणार आहे. चार उपान्त्य फे ऱ्यांसह अन्य दोन फे ऱ्या व महाअंतिम फेरी होईल. सलग ५ दिवस नटराज रंगमंदिरात ही स्पर्धा होईल. वैयक्तिक नृत्य लहान गट ५ ते १४ वर्षे, मोठा गट १५ ते ३५ व समूहनृत्य शालेय गट ५ ते १० व मोठय़ा गटात स्पर्धा होणार आहे. प्रथम येणाऱ्या स्पर्धकास मराठवाडा टॅलेंट हंट बहुमान व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अंतिम फेरीमध्ये विजय मिळविणाऱ्यास मराठी व हिंदी अल्बममध्ये संधी मिळणार आहे. मालतीबाई कदम सेवाभावी संस्था, एस. एन. प्रॉडक्शन हाउस, नांदेड, परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशन यांच्या सहकार्याने स्पर्धा होत आहे. अधिक माहितीसाठी स्टेडियम कॉम्प्लेक्स येथील प्रिंटमीडिया येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य प्रवर्तक आनंद भरोसे, राहुल वहिवाळ, सुनील तुरूकमाने, उमेश शेळके, कपिल जोंधळे आदींनी केले आहे.