यांनी तारले
* डबेवाले
* खाऊगल्ल्या
* रस्त्यावरील खाद्यपदार्थाच्या गाडय़ा आणि ठेले
* रेल्वे परिसरातील फूड मॉल
* पोळीभाजी केंद्र
आपल्या व्यवस्थापनशास्त्राची भलाभल्यांना मोहिनी घालणाऱ्या डबेवाल्यांनी पुन्हा एकदा आपण चाकरमान्यांचे खरेखुरे ‘अन्नदाते’ असल्याची ग्वाहीच ‘हॉटेल बंद’च्या निमित्ताने सोमवारी दिली.
सेवा कराला विरोध करण्यासाठी मुंबईसह राज्यभरातील हॉटेलचालकांनी सोमवारी बंद पाळला. त्यामुळे, चर्चगेटमधील फूड मॉलमध्येही त्यामुळे चांगलीच गर्दी झाली होती. खाऊ गल्ल्या या बंदपासून लांब असल्याने भुकेल्या मुंबईकरांना त्यांचा चांगलाच आधार मिळाला. रस्त्याच्या कडेला भाजीपोळी, पुलाव विकणाऱ्यांनीही आज चांगलेच तारले.