शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांच्या घरी मृत्युमुखी पडलेल्या विनोद कोंडस्कर यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी, तसेच गावंडे यांच्या निषेधार्थ नाभिक समाजाच्या वतीने उद्या, १७ नोव्हेंबर रोजी स्थानिक गांधी चौकात भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन नाभिक समाजाने केले आहे. शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांच्या बायपासवरील घरात विनोद कोंडस्कर या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याऐवजी गावंडे यांनी गावगुंड व काही नगरसेवकांच्या माध्यमातून कोंडस्कर यांच्या विधवा पत्नी व वृद्ध आईला धमकावणे व दबाव टाकण्याचे प्रकार सुरू केले आहे. त्यामुळे कोंडस्कर कुटुंबीय पुरते घाबरले आहे. गावंडे यांच्या या कृत्याच्या निषेधार्थ नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी जटपुरा गेट येथे मुंडन करून एक दिवसाचे उपोषण आंदोलन केले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी गावंडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु नाभिक समाज कोंडस्कर यांच्या पाठीशी समर्थपणे उभा राहिला. आता या गरीब कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी येत्या १७ नोव्हेंबर रोजी गांधी चौकात भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. या वेळी गावंडे यांचा जाहीर निषेध करण्यात येणार आहे. या भीक मांगो आंदोलनाला शहरातील नागरिकांनी प्रतिसाद देऊन काँग्रेसचे शहर अध्यक्ष गावंडे यांच्यामुळे वाताहत होत असलेल्या गरीब कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, असे आवाहन नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्याम राजुरकर, कार्याध्यक्ष दिनेश एकवनकर, नाभिक संघाचे अध्यक्ष रवी येसेकर, सलून असोसिएशनचे अध्यक्ष मनोज पिजदूरकर, रवी हनुमंते, विजय कोंडस्कर, दीपक नक्षणे, संतोष अतकरे यांनी केले आहे. एक समाज काँग्रेस पक्षापासून दुरावत असताना काँग्रेस नेत्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2012 रोजी प्रकाशित
नाभिक समाजाचे आज भीक मांगो आंदोलन
शहर काँग्रेस समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांच्या घरी मृत्युमुखी पडलेल्या विनोद कोंडस्कर यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी, तसेच गावंडे यांच्या निषेधार्थ नाभिक समाजाच्या वतीने उद्या, १७ नोव्हेंबर रोजी स्थानिक गांधी चौकात भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-11-2012 at 12:16 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nabhik community today staring the andolan of beging