पुढील केवळ पाचच नाही पंचवीसही नाही तर पन्नास वर्षे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कायम राहिल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. उद्यापासून सुरु होत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री ठाकरे नागपूरात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे म्हणाले, माझ्याकडे जनतेचे आशिर्वाद आहेत. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण हा संपूर्ण महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे सरकार, शासन आम्ही चालवू. जर आपण एकत्र आलो तर हे सरकार केवळ पाच वर्षेच नव्हे तर २५ वर्षेच काय ५० वर्षे आणि पिढ्यान पिढ्या कायम राहिलं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राचा खरा राजा खेड्यापाड्यातील जनता असून तो माझ्या समोर बसलाय. त्यामुळे माझा आजवरचा अनुभव पणाला लावून माझ्या गोरगरीब जनतेला समाधान देण्याचा मी प्रयत्न करेन. मुख्यमंत्री म्हणून आता माझी कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु होत आहे, त्यामुळे तुमचे आशिर्वाद असेच कायम राहू द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले.

मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then the next 5%e0%a5%a6 years will be the government of the alliance for development says uddhav thackeray