७ व्या राज्यस्तरीय मराठी बाल विज्ञान संमेलनातील कृती संशोधन स्पर्धेत येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील सन्मिल विजय लगड आणि कौशल नितीन वडनेरे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘माझ्या परिसरातील वायुप्रदुषके’ प्रयोगाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
महाराष्ट्र वित्रान मंडळाच्यावतीने जालना येथे या बाल विज्ञान संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध शाळांमधून विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक त्यात सहभागी झाले. संमेलनात एकूण १२७ कृती संशोधन प्रकल्प सादर झाले. आदर्श माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या सन्मिल आणि कौशल या विद्यार्थ्यांनी ‘माझ्या परिसरातील वायुप्रदुषके’ या विषयावर संशोधनपर प्रयोग सादर केला होता. त्यासाठी त्यांना विषयशिक्षिका अंजली ठोके यांचे मार्गदर्शन लाभले. संमेलनात प्रकल्प सादर करणारे सन्मिल व कौशल हे सर्वात लहान विद्यार्थी ठरले. संमेलनात विविध विज्ञानविषयक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी बाल वैज्ञानिक प्रदर्शन मांडण्यात आले होते. विविध तज्ज्ञ मंडळींनी सौर ऊर्जा, अणुऊर्जा, चुंबकीय ऊर्जा, त्यामागील तत्वज्ञान आदी विषयांवर प्रयोगाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. विज्ञानाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग करता येऊ शकतो हे या संमेलनामुळे तसेच सादर झालेल्या प्रकल्पामुळे अत्यंत सोप्या पध्दतीने शिकायला मिळाल्याचे सन्मिल व कौशलने सांगितले. शाळेतील पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रकल्पातून विज्ञान अधिक छान कळाले. नवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळाल्याची भावना दोघांनी व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2013 रोजी प्रकाशित
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाशिकचा ‘आदर्श’
७ व्या राज्यस्तरीय मराठी बाल विज्ञान संमेलनातील कृती संशोधन स्पर्धेत येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील सन्मिल विजय लगड आणि कौशल
First published on: 27-11-2013 at 09:16 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik sets example of ideal state level science exhibition