रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे १५ आणि १६ फेब्रुवारी २०१४ रोजी ‘उद्योग क्षेत्राचे सामाजिक दायित्व’ या विषयावर मुंबईत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रिलेशनशिप बिल्डिंग बियॉण्ड फंडिंग’ (अर्थसहाय्यापलीकडे संबंध सृजन) असे या परिषदेचे मुख्य सूत्र आहे. देशभरातील उद्योग क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांचे सुमारे १५० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार असून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
उत्तन, भाईंदर येथील ‘केशवसृष्टी’त होणाऱ्या या परिषदेत चेन्नई येथील ‘प्रकृती’ या सामाजिक संस्थेच्या ललिता कुमारमंगलम् यांचे बीजभाषण होणार आहे. ज्येष्ठ गांधीवादी आणि सवरेदयी चळवळीचे नेते गफूरभाई बिलखिया यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेची सांगता होणार आहे.
उद्योग क्षेत्राची सामाजिक बांधिलकी, उद्योग क्षेत्राशी येणारा संबंध आणि संपर्कातून सामाजिक संस्थांमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन विकासित करणे, परस्परांच्या अपेक्षांचे आकलन, परस्पर सबंध अधिक दृढ करणे, परस्पर सामंजस्य आदी विषयांवरही परिषदेत चर्चा होणार आहे.
परिषदेत सहभागी होण्यासाठी www.rmponweb.org या संकेतस्थळावरून नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी मिलिंद बेटावदकर यांच्याशी ०९८३३५०९२२२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.