युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे अवकाश जाधव यांच्या पदरात नामनिर्देशीत नगरसेवकपद पडले खरे, पण नागरी कामे करण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत. नामनिर्देशीत नगरसेवकांचा निधी संपूर्ण मुंबईतील नागरी कामांसाठी वापरता येतो. परंतु जाधव यांनी १ कोटी १९ लाख रुपयांपैकी केवळ ५७ लाख रुपये कामांवर खर्च केले असून उर्वरित रक्कम पडून आहे.
अवकाश जाधव, महिराजउद्दीन (मेराज) शेख (शिवसेना), गिरीश धानुरकर (मनसे), अश्वनि व्यास (भाजप), पारुल मेहता (काँग्रेस) या नगरसेवकांची नामनिर्देशीत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. अवकाश जाधव आणि मेराज शेख हे दोघेही आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनच ओळखले जातात. या नगरसेवकांना एक कोटी रुपयांहून अधिक नगरसेवक निधीही मिळाला होता. परंतु अवकाश जाधव वगळता अन्य नगरसेवकांनी आपला निगरसेवक निधी विविध भागांतील कामांसाठी खर्च केला.
अवकाश जाधव यांना १ कोटी १९ लाख रुपये, गिरीश धानूरकर यांना १ कोटी ६ लाख रुपये, अश्विन व्यास यांना १ कोटी १७ लाख रुपये, मेराज शेख यांना १ कोटी २० लाख रुपये, पारुल मेहता यांना १ कोटी २ लाख रुपये नगरसेवक निधी देण्यात आला होता. परंतु अवकाश जाधव यांनी नागरी कामांवर केवळ ५७ लाख रुपये खर्च केले असून ६२ लाख रुपये पडून आहेत. या पैशांमध्ये एखाद्या विभागातील नागरी कामे होऊ शकली असती. परंतु अवकाश जाधव यांनी लक्ष न दिल्यामुळे ती होऊ शकली नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nominated corporator clumsy