बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली.
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एम. भगवंतराव यांनी या मदतीचा बँक ड्राफ्ट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. बँकेचे सरव्यवस्थापक एम. पी. त्रिपाठी, उपसरव्यवस्थापक राजू गोयल, पी. एन. पांडे यांची या वेळी उपस्थिती होती. बँकिंग क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादने सामाजिक भान बाळगले असून, यापूर्वीही आपद्ग्रस्तांसाठी भरीव मदत करण्याचे कार्य बँकेने केले, अशी माहिती क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महाव्यवस्थापक प्रसाद टोंपे व बँक कर्मचारी संघटनेचे नेते प्रशांत धामणगावकर यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2013 रोजी प्रकाशित
स्टेट बँक ऑफ हैदराबादतर्फे दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी
बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी एक कोटी रुपयांची मदत करण्यात आली.
First published on: 26-04-2013 at 02:57 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One crore help from state bank of hyderabad to drought affected areas