राज्यातील अग्रगण्य बहुराज्य शेडय़ूल्ड बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या पुणे येथील भोसरी शाखेचे उद्घाटन बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विलास लांडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
या बँकेच्या पुण्यामध्ये चार शाखा सुरू असून भोसरीमध्ये पाचवी शाखा सुरू झाली आहे. तर बँकेच्या आतापर्यंत एकूण ३८ शाखा कार्यरत झाल्या आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदतीकर यांनी दिली. पुणे येथे सुरू झालेल्या हडपसर व भोसरी या दोन्ही नवीन शाखांना काल व आज ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे पाहून भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया सौंदतीकर यांनी व्यक्त केली. भोसरी शाखा उद्घाटनप्रसंगी माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सरव्यवस्थापक पी.टी.कुंभार, राहुल आवाडे, संचालक पुरुषोत्तम जाखोटिया, उगमचंद गांधी, राजेश पाटील, पांडुनाना बिरंजे, सुनील हावळ, रमेश केटकाळे, सुजाता जाधव, राजेंद्र बचाटे, रमेश निपाणीकर आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2013 रोजी प्रकाशित
कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेच्या भोसरी शाखेचे उद्घाटन
राज्यातील अग्रगण्य बहुराज्य शेडय़ूल्ड बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या पुणे येथील भोसरी शाखेचे उद्घाटन बुधवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विलास लांडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बँकेचे संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते.
First published on: 09-01-2013 at 08:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening of branch of kallappanna awade ichalkaranji janata bank at bhosari