ब्रीज या आंतरराष्ट्रीय खेळाविषयी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या सांगली जिल्हा ब्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्रिंबकराव ऊर्फ पी. व्ही. जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या व्दि वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये शंकुतला कुलकर्णी (उपाध्यक्ष), शाम फडणीस (कार्यवाह), महादेव काळे (खजिनदार), डॉ.अरुण जोशी (ज्येष्ठ सल्लागार) तसेच कार्यकारी मंडळात विलास चितळे, आनंद चिपळूणकर, माधवी करमरकर, सुहास फडणीस, अजित लिमये व संस्था प्रतिनिधी म्हणून मेदिनी जोशी व वसुधा आठवले यांचा समावेश आहे. या सभेत संस्थेच्या ३४ व्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
अध्यक्षपदी जोशी
ब्रीज या आंतरराष्ट्रीय खेळाविषयी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या सांगली जिल्हा ब्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्रिंबकराव ऊर्फ पी. व्ही. जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या व्दि वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
First published on: 05-01-2013 at 09:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P v joshi selected as a president of sangli dist bridge asso