‘वेकोलि’तील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना वेकोलिचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डी.सी. गर्ग यांच्या हस्ते नुकतेच मदतीचे धनादेश देण्यात आले. कोल माईन्स ऑफिसर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (सीएमओएआय) वतीने चालविण्यात येत असलेल्या गट विमा योजनेतून ही मदत देण्यात आली.
लालपेठ खाणीचे वरिष्ठ व्यवस्थापक ए.के. वर्मा व रवी कुमार यांचे निधन झाले. वर्मा यांच्या कुटुंबीयांना २० लाख रुपये तर कुमार यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांचा धनादेश डी.सी. गर्ग यांच्या हस्ते देण्यात आले. कोल माईन्स ऑफिसर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या या उपक्रमाची प्रशंसा करून वेकोलितील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन गर्ग यांनी दिले. कार्यक्रमाला  कंपनीचे तांत्रिक संचालक ओम प्रकाश, वित्त संचालक सुशील बहल, कार्मिक संचालक रूपक दयाल, ‘सीएमओएआय’चे अध्यक्ष डी. सुब्बाराव, सचिव पी. राव उपस्थित होते.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passed away workers in vekoli families now get the help