भूत काढण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मांत्रिकाला आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिरज येथील न्यायालयाने मंगळवारी दिले. या भोंदू  मांत्रिकाविरुद्ध पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
अब्दुल्ला शेख या मांत्रिकाने मिरजेतून एका अल्पवयीन मुलीला भूत काढण्याच्या बहाण्याने दि. १८ ऑगस्ट रोजी पळवून नेले होते. बिहारमधील दरबंगा येथे जात असताना पोलिसांनी अलाहाबाद स्थानकावर मांत्रिकाला मुलीसह पकडले. सोमवारी या दोघांनाही मिरजेत आणून मांत्रिकाला अटक करण्यात आली.
पालकांच्या तक्रारीनुसार मांत्रिकाविरुद्ध अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांत्रिकाला मंगळवारी न्यायालयात उभे केले असता दि. ३ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. दोघांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.