‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग दादागिरी, दडपशाही व सांस्कृतिक दहशतीने बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या परशुराम जयंती उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन, शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण संस्था व पुरोहित संघ या संघटनांवर बंदी घालावी, या मागणीसाठी सोमवारी अत्याचारविरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
दोन दिवसांपूर्वी ‘शिवाजी अंडरग्राउंड..’ या नाटकाचा प्रयोग बंद पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न संबंधित संघटनांनी केला होता.
विशिष्ट जाती धर्माच्या देवांना पुढे आणून, भावनिक राजकारण करून नाटय़ प्रयोग बंद पाडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या संघटनांच्या निषेधार्थ या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. राहूल तुपलोंढे, अॅड. अरूण दोंदे, सोमनाथ गायकवाड आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. परशुराम जयंती उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन, शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण संस्था, पुरोहित संघ या सांस्कृतिक दहशतवाद वाढविणाऱ्या संघटनांवर बंदी आणावी, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत प्रयोग गुंडगिरीने व दडपशाहीने बंद पाडणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, पुरोहित संघाच्या अध्यक्षांच्या परिवाराच्या मालमत्तेची चौकशी करावी, विशिष्ठ धर्माचे स्तोम माजविणाऱ्या व्यक्ती व पक्ष संघटनांवर देशद्राहाचा आरोप ठेवून गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही कृती समितीने केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2013 रोजी प्रकाशित
हिंदुत्ववादी संघटनांवर बंदी घालण्यासाठी निदर्शने
‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाचा प्रयोग दादागिरी, दडपशाही व सांस्कृतिक दहशतीने बंद पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या परशुराम जयंती उत्सव समिती, हिंदू एकता आंदोलन, शुक्ल यजुर्वेदीय ब्राम्हण संस्था व पुरोहित संघ या
First published on: 30-07-2013 at 09:38 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest in against hinduwadi assocations