स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोमवारी परभणी व पाथरी येथे रास्ता रोको करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रास्ता रोकोमुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.
इंदापूर येथे सोमवारी पहाटे तीन वाजता खासदार शेट्टी व सदाभाऊ खाते यांना पोलिसांनी अटक केली. हे वृत्त समजताच जिल्ह्य़ात शेट्टी यांच्या अटकेचे प्रतिसाद उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक सकाळी परभणी शहराच्या दक्षिणेस असलेल्या गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगढ नाला येथे रास्ता रोको केले. आंदोलनाबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल माखणीकर, पोलीस निरीक्षक चाटे आदी घटनास्थळी पोहचले. या रस्त्यावर तब्बल तीन तास रास्तारोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष माणिक कदम, दिगंबर पवार, गजानन तुरे, बाळासाहेब कदम आदींनी केले. पाथरी येथे सेलू कॉर्नर येथे दुपारी रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोमुळे परभणी व सेलूकडे जाणारी वाहतूक दोन तास विस्कळीत होती. आंदोलनाचे नेतृत्व दीपक लिपणे, शालीग्राम लिपणे, राजाभाऊ कोल्हे, नवनाथ कोल्हे आदींनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2012 रोजी प्रकाशित
खा. शेट्टी यांच्या अटकेचा निषेध; परभणी व पाथरीत ‘रास्ता रोको’
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोमवारी परभणी व पाथरी येथे रास्ता रोको करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रास्ता रोकोमुळे दोन्ही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 13-11-2012 at 01:30 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest on minister mr sheety arrest road andolan in parabhni and patri