महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील सेव्हन हिल उड्डाणपुलाजवळ रस्ता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेमध्ये भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त मेजर पी. आर. डंगवाल (वय ८२) यांचा सहभाग लक्षणीय ठरला.
आम आदमी पार्टीतर्फे दर शुक्रवारी सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत विविध चौक, ऐतिहासिक वास्तू आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रस्ता स्वच्छता मोहिमेत संदीप नागोरी, गोविंद पाटील, देवांग जोशी, बाळासाहेब सराटे, रमेश जाधव, एस. एन. पाटील, शामल इंगळे, निसार अहमद खान, आदी सहभागी झाले होते.