बस प्रवासादरम्यान सुमारे ९ लाख रुपये किंमतीचे ३० तोळे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. लातूर बसस्थानकात सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. अन्य एका घटनेत उद्गीर बसस्थानकामध्ये ५ लाखांची लूट करण्यात आली.
लातूर-उदगीर बसमध्ये प्रणिता अरुणकुमार पाटील लातूरहून बसल्या होत्या. त्या नळेगाव येथे गेल्यानंतर त्यांच्या पर्समधील ३० तोळे ३ ग्रॅम सोने ठेवलेली पेटी गायब झाल्याचे लक्षात आले. यात २ पाटल्या, ४ बांगडय़ा, २ तोडे, १ ब्रेसलेट, ४ अंगठय़ा आदी दागिने होते.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नळेगाव पोलीस ठाण्यात या बाबत माहिती दिली. पोलिसांनी संपूर्ण बसची झाडाझडती घेतली, पण त्यात काही सापडले नाही. त्यानंतर राजेश सलगरे यांनी लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ाविरुद्ध फिर्याद दिली. शुक्रवारी वेळ अमावस्येच्या दिवशीही उदगीर बसस्थानकात चोरटय़ांनी धुमाकूळ घालून ५ लाखांची लूट केली. उदगीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery in two different insidence